लॉकडाऊनमध्ये अ‍ॅमेझॉन देणार 50 हजार जणांना नोकरी

अ‍ॅमेझॉन इंडियाने लॉकडाऊनच्या काळात ग्राहकांची गरज पुर्ण करण्यासाठी 50 हजार तात्पुरत्या स्वरुपाच्या नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. ही भरती अ‍ॅमेझॉनच्या फुलफिलमेंट सेंटर्स आणि डिलिव्हरी नेटवर्क्समध्ये होईल. हजारो असोसिएट्स ग्राहकांची ऑर्डर घेणे, पॅक करणे, शिप करणे आणि डिलिव्हरी करण्यास मदत करेल.

याबाबतची माहिती देताना अ‍ॅमेझॉन इंडिया कस्टमर फुलफिलमेंट ऑपरेशन्स, एपीएसी, एमईएनए आणि एलएटीएएम, उपाध्यक्ष अखिल सक्सेना म्हणाले की, कोव्हिड-19 महामारीमुळे एक गोष्ट आम्ही शिकलो की अ‍ॅमेझॉन आणि ई-कॉमर्स ग्राहक, छोटे व्यवसाय आणि देशासाठी किती महत्त्वपुर्ण भूमिका निभावू शकते. आम्ही या जबाबदारीला गंभीरतेने घेतले आहे. या कठीण काळात लहान आणि अन्य व्यवसायांना आमच्या ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी आमची टीम जे काम करत आहे, त्यावर आम्हाला गर्व आहे.

अ‍ॅमेझॉनने सुरक्षित डिलिव्हरीसाठी असोसिएट्स, पार्टनर्स, कर्मचारी आणि ग्राहकांसाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. यात मास्क अनिवार्य, दररोज तापमान तपासणे, सर्व साइट्सवर साफ-सफाई, वारंवार हात धुवणे आणि सॅनिटायझेशन इत्यादींचा समावेश आहे.

Leave a Comment