देशातील ही 5 शहरे होत आहेत कोरोनाची मुख्य केंद्र

देशात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढतच चालला आहे. देशातील 5 शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. दिल्ली, चैन्नई, मुंबई, अहमदाबाद आणि ठाणे या 5 शहरांमध्ये देशातील 60 टक्के कोरोनाग्रस्त आढळले आहेत.

मुंबईत 20 टक्के प्रकरण –

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून, येथे 40 हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्त आहेत. यातील 27 हजार रुग्ण एकट्या मुंबईत आढळले असून, देशाच्या तुलनेत ही आकडेवारी 21.8 टक्के आहे. म्हणजेच देशातील प्रत्येकी पाचवा संक्रमित या शहरात आहे. मुंबईत 5 हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्त बरे झाले आहेत.

दिल्लीत 12 हजारांपेक्षा अधिक रुग्ण –

राजधानी दिल्लीत देखील कोरोनाग्रस्तांचा आकडा 12 हजारांच्या पुढे गेला आहे. देशाच्या एकूण प्रकरणात ही आकडेवारी 10 टक्के आहे. दिल्लीतील जवळपास 5 हजार रुग्ण बरे झाले असून, 200 लोकांचा मृत्यू आहेत.

चैन्नई –

महाराष्ट्रानंतर तामिळनाडूमध्ये देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त आहेत. येथे 14 हजार कोरोनाग्रस्त आढळले आहेत. यातील जवळपास 9 हजार रुग्ण एकट्या चैन्नईत आहेत. 3,773 रुग्ण बरे झाले असून, 70 लोकांचा मृत्यू झाला आहे.

अहमदाबाद –

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित तिसरे राज्य असलेल्या गुजरातमधील अधिकांश प्रकरण अहमदाबादमध्ये आहेत. गुजरातमध्ये एकूण प्रकरण 13,268 आहेत. यातील 9,724 केवळ एकट्या अहमदाबादमध्ये आढळले आहेत. शहरातील साडेतीन हजार रुग्ण बरे झाले असून, 645 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे.

ठाणे –

महाराष्ट्रात मुंबईनंतर सर्वाधिक वाईट स्थिती ठाणे आणि पुण्यात आहे. ठाण्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 5 हजारांच्या पुढे गेला आहे. यातील 1 हजार रुग्ण बरे झाले असून, 84 जणांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment