सलमानच्या ‘रेडी’ चित्रपटात झळकलेल्या अभिनेत्याचे निधन


सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध विनोदी अभिनेता मोहित बघेल याचे निधन झाले आहे. तो केवळ २७ वर्षांचा होता. त्याचे निधन कर्करोगामुळे झाल्याची माहिती ‘कॉमेडी नाईट्स विथ कपिल’ या शोचे दिग्दर्शक राज शांडिल्य यांनी ट्विट करुन दिली. लहानपणापासून मोहित कर्करोगग्रस्त होता. तो अखेरच्या काही दिवसांमध्ये नोएडा येथील रुग्णालयात उपचार घेत होता. पण कर्करोगाचा प्रभाव वाढल्यामुळे त्याचा जीव वाचवण्यात डॉक्टर अपयश आले.

उत्तर प्रदेशमधील एका गरीब कुटुंबात मोहितचा जन्म झाला होता. तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला. त्यानंतर त्याने ‘छोटे मिया’ या कॉमेडी शोमधून रुपेरी पडद्यावर पदार्पण केले होते. त्याला सलमान खानच्या ‘रेडी’ या चित्रपटात त्यानंतर काम करण्याची संधी मिळाली. त्याने या चित्रपटात ‘छोटे अमर चौधरी’ ही भूमिका साकारली होती. त्याचा अभिनय पाहून सलमान खान देखील प्रचंड खुश झाला होता. पण आपल्या फिल्मी कारकिर्दीत आणखी यश मिळवण्याअगोदरच त्याचा प्रवास कायमचा थांबला.

Leave a Comment