हार्दिकच्या २२८ नंबर जर्सीचे हे आहे गुपित

फोटो साभार लोकसत्ता

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या नेहमीच चर्चेत असतो. कधी मैदानावरील कामगिरीमुळे तर कधी वैयक्तिक लाईफमुळे. प्रत्येक खेळात खेळाडूला एक जर्सी नंबर असतो तसा तो क्रिकेटमध्येही आहे. हा नंबर खेळाडू स्वतः निवडू शकतो. महान खेळाडूना १० नंबर आवर्जून दिला जातो. हार्दिक पांड्याच्या जर्सीचा नंबर आहे २२८.

या जर्सी नंबरमागे प्रत्येक खेळाडूची काही तरी कारणे असतात. हार्दिकने २२८ नंबर जर्सी साठी निवडला त्यामागेही कारण आहे. याचा खुलासा आयसीसीने हार्दिकच्या एका शेअर केलेल्या फोटोखाली कॅप्शन देताना केला आहे. याच नंबरची जर्सी हार्दिक का वापरतो या विषयी क्रिकेट स्टॅटीस्टीयन मोहनदास मेमन सांगतात, २००९ मध्ये हार्दीक अंडर १६ संघात विजय मर्चंट स्पर्धेत बडोदा टीमचा कप्तान होता. मुंबई विरुद्ध खेळताना त्याने २२८ रन्स काढल्या. त्यावेळी तो त्याच्या करिअरचा सर्वात मोठा स्कोर होता आणि पाहिले द्विशतक सुद्धा. त्यावेळी त्याने ८ तास फलंदाजी केली आणि तो बडोद्यात प्रसिद्ध झाला.

हार्दिकचा हा पहिलाच सिझन होता. त्यानंतर तो अंडर १९ खेळाला. पण पहिल्याच सिझन मध्ये त्याने ५ विकेटही घेतल्या होत्या आणि त्याच्या ऑलराउंडर बनण्याची सुरवात तेथूनच झाली असे म्हणता येईल. त्यामुळे हार्दिकने जर्सीचा नंबर २२८ निवडला असावा.

Leave a Comment