शाओमी रेडमी १० एक्स २६ मे ला होणार लाँच

फोटो साभार ९१ मोबाईल्स

शाओमीची सब ब्रांड रेडमी नवीन स्मार्टफोन सादर करण्याच्या तयारीत असून २६ मे रोजी हा फोन रेडमी १० एक्स नावाने लाँच केला जात आहे. लाँच अगोदरच या फोनसंबंधी अनेक लिक्स आले होते. मात्र आता कंपनीचे जनरल मॅनेजर लु वैबिंग यांनी काही दिवसापूर्वी या फोनची माहिती देणारी खास फिचर्स शेअर केली आहेत. त्यानुसार हा फोन एमोलेड डिस्प्ले आणि ३० एक्स झूम सपोर्ट सह असेल.

चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वाईबो नुसार हा फोन ड्युअल सीम आहे आणि दोन्ही सीम कार्डवर युजरला ५ जी सुविधा मिळणार आहे. फोटो अनुभव अधिक आकर्षक करण्यासाठी ३० एक्स झूमचा सपोर्ट दिला गेला असून क्वाड कॅमेरा सेटअप आहे. मेन कॅमेरा ४८ एमपीच असून चीनच्या रिटेलर वेबसाईटवर त्याचे प्रीबुकिंग सुरु झाले आहे.

ब्ल्यू, गोल्ड, पर्पल आणि व्हाईट कलर मध्ये या फोनची ४ जी आणि ५ जी अशी दोन्ही व्हेरीयंट उपलब्ध असतील. ६ जीबी रॅम, ६४ जीबी आणि १२८ जीबी मेमरी तसेच ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी मेमरी अशी व्हेरीयंट असून त्यांची किंमत १५ ते १८ हजार रुपयादरम्यान आहे. फोनला फास्ट चार्जिंग सपोर्ट बॅटरी दिली गेली आहे.

Leave a Comment