देशांतर्गत विमानसेवा सुरु, मात्र घ्यावी लागणार ही काळजी

फोटो साभार न्यूज बाईटस

येत्या २५ मे पासून करोना साथीमुळे गेले दोन महिने बंद असलेली देशांतर्गत विमान सेवा सुरु होत आहे. अर्थात त्यासाठी केंद्र सरकारने विमान कंपन्या आणि प्रवासी यांच्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. त्यानुसार प्रवाश्यांना मास्क बंधनकारक असून त्यांना थर्मल तपासणी केंद्रातूनच आत प्रवेश दिला जाणार आहे.

विमान प्रवासासाठीच्या नियमानुसार १४ वर्षांवरील सर्व प्रवाशांना आरोग्यसेतू अॅप इन्स्टॉल करणे आणि त्यावर ग्रीन स्टेटस असणे बंधनकारक आहे. प्रवासी ऑथोराइज्ड टॅक्सीचाच वापर करू शकतील आणि फ्लाईट सुटण्याच्या किमान दोन तास अगोदर त्यांना विमानतळावर उपस्थित राहावे लागेल. अन्य प्रवासी कर्मचारी यांच्यात किमान ६ फुट अंतर ठेवावे लागेल.

मास्क आणि शुकव्हर घालणे आवश्यक आहे आणि केवळ वेबचेक सुविधा उपलब्ध राहील. विमानात जाण्याअगोदर पुन्हा एकदा बॉडी तापमान चेक केले जाणार आहे आणि ते नियमापेक्षा अधिक असेल तर विमानात प्रवेश मिळणार नाही. ८० वर्षावरील वृध्द विमान प्रवास करू शकणार नाहीत.

विमानाच्या सीट मध्ये बसल्यावर पुन्हा सॅनीटायझेशन केले जाणार असून प्रवाशांनी विमानातील क्रू बरोबर निष्कारण संवाद करायचा नाही. चेक इन लगेज नेता येईल पण केबिन लगेजला परवानगी नाही. प्रत्येक विमान कंपनी प्रवासअगोदर एक फॉर्म देणार असून त्यात कोविड १९ हिस्ट्री माहिती लिहावी लागेल तसेच गेल्या महिन्याभरात क्वारंटाईन व्हावे लागले असेल तर त्याचीही माहिती द्यावी लागणार आहे.

Leave a Comment