त्राग्यातून झाला होता कुरकुरीत चिप्सचा जन्म


आज जगभरात कोणत्याची रेस्टॉरंटमध्ये गेलात तर अक्षरशः लाखो प्रकारचे पदार्थ तुम्हाच्या जिभेची तृप्ती करण्यासाठी सज्ज असतात. आज शेफ याचा अर्थ केवळ खाद्यपदार्थ बनविणारा म्हणून नाही तर विविध नवनवीन पाककृती करणारा आणि नवीन पदार्थ जन्माला घालणारा असा आहे. टीव्हीवर जगभरातील गाजलेले शेफ त्यांचे स्वतःचे चॅनल्स चालवीत आहेत आणि त्यातून देशोदेशीच्या पाककृती आपण समजून घेऊ शकतो आहोत. हे झाले आजचे. पण फार पूर्वी म्हणजे १०० वर्षापूर्वी इतक्या सुविधा नव्हत्या आणि तरीही त्याकाळी असे लज्जतदार पदार्थ बनत होतेच. लहान मुलांपासून अगदी म्हाताऱ्यांपर्यत आवडणारे बटाटा चिप्स कसे तयार झाले किंवा जन्माला आले याची माहिती अनेकांना नसेल. सांगायचे कारण म्हणजे हे चिप्स काहीतरी विशेष चांगले बनवयाचे म्हणून नाही तर एका शेफच्या त्राग्यातून जन्माला आले हे अनेकांना माहिती नसेल.


बटाटा चिप्सच्या जन्माची कहाणी अशी सांगतात कि, २४ ऑगस्ट १८५३ मध्ये न्युयॉर्कच्या सर्तोगा स्प्रिंग मधील मून लेक रिसोर्टमध्ये जॉर्ज क्रून नावाचा शेफ होता. या रिसोर्टमध्ये कॉर्नेलीयास नावाचा एक ग्राहक येत असे. तो उद्योगपती होता पण खूप तिरसट होता. त्याने फ्रेंच फ्राईजची ऑर्डर दिली. तेव्हा फ्रेंच फ्राईज अमेरीकेत खूपच लोकप्रिय होते. कॉर्नेलीयासला त्याच्या मागणीप्रमाणे फ्रेंच फ्राईज दिले गेले पण त्याने ते खूप जाड आणि नरम असल्याची तक्रार केली. मीठ कमी आहे असेही सांगितले. तेव्हा त्याला पुन्हा नव्याने फ्रेंच फ्राईज बनवून दिले गेले तरी त्याची तक्रार संपेना. दोन वेळा हा प्रकार झाल्यावर शेफ जॉर्ज चिडला आणि कॅर्नेलीयासला धडा शिकवायचा असा त्याने निश्चय केला.


जॉर्जने बटाटा घेतला त्याचे अगदी पातळ काप काढले, फोर्कने खाता येऊ नयेत इतके ते कुरकुरीत तळले आणि त्याच्यावर भरपूर मीठ शिंपडून कटकट्या कॅर्नेलीयासला दिले. हे पाहून कॅर्नेलीयास नक्की बाहेरचा रस्ता पकडणार अशी जॉर्जची अपेक्षा होती मात्र झाले उलटेच. गोल कुरकुरीत फ्रेंच फ्राईज खाल्ल्यावर कॅर्नेलीयास याने एकदम वा असे म्हटले आणि हे काय बनवलेय त्याची चौकशी केली. बिचार्या जॉर्जला आपण आज एक नवीन पदार्थ जन्माला घातला याची कल्पनाही नव्हती.


१९५० पर्यत पेपर पॅकेट मध्ये बटाटा सॉल्टेड चिप्स मिळू लागले होते. आयरिश पोटॅटो कंपनी टायतो क्रिप्सचा मालक स्पुड मर्फी याने फ्लेवर्ड चिप्सचे तंत्र विकसित केले आणि त्याने चीज व ओनियन फ्लेव्हर व त्यापाठोपाठ सॉल्ट व्हिनेगर स्वादाचे चिप्स तयार केले. आज शेकडो स्वादात हे चिप्स बाजारात उपलब्ध आहेत. चिप्सचा शोध जॉर्जने लावला असला तरी १८१७ मध्ये लिहिल्या गेलेल्या ब्रिटीश कुक विलियम किच्नेर याच्या रेसिपी बुक द कुक्स ओर्केल मध्ये चिप्सची रेसिपी सापडते. त्यात त्याने बटाट्याचे पातळ काप काढून ते धुवून कपड्यावर सुकवा आणि तेलात कुरकुरीत तळावेत असे लिहिले

Leave a Comment