तालिबानी टॉप लीडर हक्कानी करोनाग्रस्त

फोटो साभार अमरउजाला

दिल्ली, कबुल दहशतविरोधी टीम्स कडून मिळालेल्या माहितीनुसार तालिबानी संघटनेचा उपनेता सिराजुद्दीन हक्कानी व अन्य तीन कमांडर्सचे करोना चाचणी रिपोर्ट पोझिटिव्ह आले आहेत. हक्कानी तालिबान तलवार शाखा हक्कानी नेटवर्कचा प्रमुख आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याला पाकिस्तानच्या रावळपिंडी येथील रुग्णालयात दाखल केले गेले आहे.

करोनाची लागण झालेल्या अन्य तालिबानी नेत्यात मुल्ला आमीरखान मुत्तकी, फजल मजलुम यांचा समावेश आहे. हे दोन्ही नेते तालिबान आणि अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या विशेष चर्चेतील विशेष प्रतिनिधी टीमचे सदस्य आहेत. मुल्ला नुरुद्दिन तुर्बीसह या दोघांना क्वेट्टा आणि कराची येथील हॉस्पिटल मध्ये दाखल केले गेल्याचे समजते. तालिबानी प्रवक्ता जबी हुल्लाह याने मात्र हे नेते करोनाची शिकार बनल्याचे फेटाळले असून सर्वजण स्वस्थ असल्याचे ट्विट केले आहे.

Leave a Comment