काय आहे क्रिकेट मधील टाईम आउट नियम

फोटो साभार स्पोर्ट्सकिडा

क्रिकेट या भारतीयांच्या अतिआवडत्या खेळात खेळाडू आउट कसे होतात याचे नियम बहुतेक साऱ्यांना माहिती आहेत. मात्र टाईम आउट या नियमाविषयी फारशी माहिती प्रेक्षकांना नसते इतकेच काय पण बरेचदा क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूलाही त्याबद्दल माहिती नसते. हा नियम फलंदाजांसाठी केव्हा आणि कश्या परिस्थितील लागू झाला हे पाहणे त्यामुळेच करमणुकीचे आहे.

हा नियम लागू होण्यासाठी कारणीभूत झाला एक सामना तो ही १०१ वर्षापूर्वी खेळाला गेलेला. २२ मे १९१९ रोजीच हा सामना इंग्लंड मध्ये ससेक्स आणि समरसेट यांच्यात खेळाला गेला होता आणि तो कौंटी सामना होता. त्यावेळी ससेक्सचा फलंदाज हरोल्ड हॅगेट मैदानावर वेळेत आला नाही त्यामुळे अंपायरनी त्याला टाईम आउट दिले. खरेतर हेरॉल्डचा पाय दुखावला होता आणि त्यामुळे मैदानावर येण्यास थोडा वेळ लागेल हे सांगण्यासाठी तो क्रिकेट जर्सी शिवाय सध्या कपड्यात अंपायरकडे येत होता. पण त्याचे हे अपील अमान्य केले गेले. विशेष म्हणजे त्यावेळी क्रिकेट मध्ये टाईम आउट असा कोणताही नियम नव्हता.

यामुळे स्कोअररला स्कोअर शीट मध्ये हेरॉल्डच्या नावावर आउटचे काय कारण लिहायचे हे कळले नाही त्यामुळे त्याने अब्सेंट असे कारण लिहिले. हा सामना टाय झाला. अंपायरच्या निर्णयाबाबत नंतर खूप चर्चा झाल्या पण एमसीसीने म्हणजे क्रिकेट नियम बनविणाऱ्या संस्थेने अंपायरचा निर्णय योग्य ठरविला आणि तसा नवा नियम तयार केला. या नियमानुसार एक फलंदाज आउट झाल्यावर दुसऱ्या फलंदाजाने पीच पर्यंत पोहोचण्याची वेळ निश्चित केली गेली. त्यानुसार हा वेळ दोन मिनिटांपेक्षा अधिक असता कामा नये.

यापेक्षा अधिक वेळ फलंदाजाने लावल्यास दुसरी टीम टाईम आउटची मागणी करू शकते. तसेच अंपायर सुद्धा त्यांच्या मताने फलंदाजाला आउट देऊ शकतो. आज पर्यंत आंतरराष्ट्रीय सामन्यात कुणी या प्रकारे आउट झालेले नाही मात्र प्रथम श्रेणी सामन्यात अश्या प्रकारे पाच फलंदाज आउट झाले आहेत.

Leave a Comment