रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ पाहणाऱ्यांना युट्यूब पाठवणार ‘बेडटाईम रिमाइंडर्स’

रात्री उशिरापर्यंत युट्यूबवर व्हिडीओ पाहण्याची अनेकांना सवय असते. अशा युजर्ससाठी आता गुगलच्या मालकीचे व्हिडीओ प्लॅटफॉर्म युट्यूबने एक खास फीचर आणले आहे. युट्यूबने रात्री उशिरापर्यंत व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी ‘बेडटाईम रिमाइंडर्स’ नावाचे फीचर आणले आहे. नावाप्रमाणेच हे फीचर युजर्सला व्हिडीओ पाहणे थांबविण्याची आणि झोपण्याचे नॉटिफिकिशेन पाठवले.

हे फीचर अँड्राईड आणि आयओएसवर उपलब्ध असून, लवकरच सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआउट केले जाणार आहे. हे फीचर केवळ मोबाईल डिव्हाईससाठी उपलब्ध असेल.

या फीचरद्वारे युजर्स व्हिडीओ पाहणे कधी थांबवायचे, यासाठी रिमाइंडर्स सेट करू शकतात. अ‍ॅपच्या सेटिंग्समध्ये युजर्स व्हिडीओ पाहण्याचा वेळ – व्हिडीओ पाहणे थांबविण्याचा वेळ, असा दोन्ही वेळ सेट करू शकतील. सोबतच व्हिडीओ पाहताना रिमाइंडर हवे की व्हिडीओ पुर्ण पाहून झाल्यावर रिमाइंडर हवे हे देखील युजर ठरवू शकतील.

हे फीचर सुरू करण्यासाठी युजर्सला युट्यूब सेटिंग्समध्ये जाऊन ‘Remind me when it’s time for bed’ हा पर्याय निवडावा लागेल. अलार्मप्रमाणेच यात ‘डिसमिस’ आणि ‘स्नूझ’ असे पर्याय मिळतील. यात स्नूझ टाईम 10 मिनिटांचा असेल.

Leave a Comment