झोपण्यासाठी ही कंपनी देणार तासाला 5,500 रुपये पगार

कोरोना व्हायरस महामारीमुळे अर्थव्यवस्थेला मोठे नुकसान झाले आहेत, यामुळे अनेक कंपन्या आपल्या कामगारांना कामावरून काढत आहेत. मात्र दुसरीकडे काही कंपन्या खास कामासाठी अर्ज देखील मागवत आहेत. अशाच एका ब्रिटनमधील होमवेअर आणि फर्निचर कंपनीने ‘कंफर्ट तज्ञ’ या पदासाठी अर्ज मागवले आहेत. येथे कर्मचाऱ्याला केवळ त्यांच्या बेडवर झोपून आराम, आकार, गुणवत्ता, टिकाऊपणा आणि अनुभव सांगावा लागेल.

ऑलिव्हिया कंपनीचे संस्थापक निक माउट्टर यांनी सांगितले की, आमच्या कंपनीकडे केवळ गुणवत्तेबाबतच नाहीतर फॅशनबाबत देखील आवड आहे. त्यामुळचे प्रत्येक गोष्टींवर बारीक लक्ष असणाऱ्याचा शोध घेणे महत्त्वाचे आहे. बेडवर पडून कोणीही झोपू शकते. मात्र आम्हाला अशी व्यक्ती हवी आहे, जी अनुभवाचे विश्लेषण करेल आणि सविस्तर फीडबॅक देईल.

या कामाची खास गोष्ट म्हणजे कंपनी स्वतः कर्मचाऱ्याच्या घरी महिन्याला दोन बेड पाठवेल व कर्मचाऱ्याला त्याचा रिव्ह्यू करावा लागेल. या कामासाठी कर्मचाऱ्याला तासाला 60 पाउंड्स (जवळपास 5,500 रुपये) मिळतील.

18 वर्षांवरील व झोपण्यासंदर्भात कोणतीही समस्या नसलेली व्यक्ती कंपनीची वेबसाईट olivias.com वर जाऊन 29 मे 2020 पर्यंत अर्ज करू शकतात.

Leave a Comment