लवकरच लाँच होणार या 5 शानदार कार्स

कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. आता हळुहळू कार्सची विक्री आणि उत्पादन सुरू होत आहे. याशिवाय काही नवीन कार्स देखील लाँच होत आहेत. भारतीय बाजारात पुढील काही महिन्यात लाँच होणाऱ्या कार्सविषयी जाणून घेऊया.

Image Credited – navbharattimes

ह्युंडाई आय20 –

ह्युंडाई नवीन आय20 ला फेस्टिव्ह सीझनच्या काळात लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही कार तीन इंजिन पर्यायामध्ये येईल. यात 1.2-लीटर, नेच्युरली-ऐस्परेटेड पेट्रोल, 1.5-लीटर डिझेल आणि 1.0-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनचा समावेश आहे. नवीन ह्युंडाई आय20 मध्ये अनेक शानदार फीचर्स मिळतील. यात 10.25-इंच स्क्रीनसोबत फुल-डिजिटल इंस्ट्रूमेंट कंसोल, अँड्रॉयड ऑटो आणि अ‍ॅपल कारप्लेसोबत 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, अ‍ॅम्बिऐंट लाइटिंग, वायरलेस स्मार्टफोन चार्जर, की-लेस एंट्री, पुश बटन स्मार्ट आणि बोस प्रीमियम ऑडियो सिस्टम सारख्या फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय कारमध्ये व्हेंटिलेटेड सीट्स, 6-एयरबॅग्स, रिव्हर्स कॅमरा आणि ऑडियो कंट्रोल देखील मिळेल.

Image Credited – navbharattimes

होंडा सिटी –

लॉकडाऊन संपल्यानंतर नवीन होंडा सिटी लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन होंडा सिटीचा लूक सध्याच्या मॉडेलपेक्षा वेगळा आहे. यात डीआरएलसोबत नवीन एलईडी हेडलॅम्प क्लस्टर, नवीन ग्रिल, नवीन एलॉय व्हिल्ज आणि एलईडी सिग्नेचरसोबत रिडिजाइन्ड स्प्लिट टेल लाइट्स मिळेल. कारमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, नवीन स्टेयरिंग व्हिल, सेमी-डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर आणि इलेक्ट्रिक सनरूफ सारखे फीचर्स असतील. होंडा सिटी 1.5-लीटर पेट्रोल आणि 1.5-लीटर डिझेल इंजिन पर्यायात येईल.

Image Credited – indianauto

दॅडसन रेडी-गो फेसलिफ्ट –

दॅटसनने काही दिवसांपुर्वीच रेडी-गो चा टीझर लाँच केला आहे. ही एंट्री लेव्हल कार मे महिन्याच्या अखेर अथवा जूनमध्ये लाँच होईल. कारमध्ये नवीन हनीकॉम्ब शेप ग्रिल, स्लिक हेडलॅम्प क्लस्टर, एल-शेप एलईडी फॉग लॅम्प आणि एलॉय व्हिल्ज सारखे बदल पाहण्यास मिळतील. नवीन रेडी-गोमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, स्टेयरिंग माउंटेड कंट्रोल्स आणि डिजिटल इंस्ट्रूमेंट पॅनलसारखे फीचर्स मिळतील. कारमध्ये बीएस-6 कम्प्लायंट 0.8-लीटर आणि 1.0-लीटर पेट्रोल इंजिन मिळेल.

Image Credited – navbharattimes

किआ सॉनेट –

किओ मोटर्सने आपल्या छोट्या एसयूव्हीला ऑटो एक्स्पोमध्ये सादर केले होते. किआ सॉनेट जुलै ते सप्टेंबर महिन्यात लाँच होऊ शकते. यात टायगर-नोज ग्रिल आणि डीआरएलसोबत स्लीक एलईडी हेडलॅम्प मिळेल. या नवीन एसयूव्हीमध्ये टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, कनेक्टेड कार टेक्नोलॉजी, इलेक्ट्रिक सनरूफ आणि ऑटोमॅटिक एसीसह अनेक शानदार फीचर्स असतील. यात1.2-लीटर नेच्युरली ऐस्परेटेड आणि 1.0-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळू शकते. तर डिझेल इंजिनमध्ये 1.5-लीटर इंजिन मिळम्याची शक्यता आहे. या एसयूव्हीची सुरुवाती किंमत जवळपास 7 लाख रुपये असेल.

Image Credited – navbharattimes

एमजी हेक्टर प्लस –

हेक्टरच्या 6 आणि 7 सीटर व्हर्जन हेक्टर प्लसला ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आले होते.  यामध्ये वेगळ्या स्टाइलचे ग्रिल, रिडिजाइन्ड फ्रंट बंपर, हेडलॅम्प यूनिटसाठी ब्लॅक मास्किंग, वेगळे एलईडी डीआरएल सिग्नेचर, वेगळ्या स्टाइलचे टेललॅम्प आणि नवीन बूट लिड मिळेल. ही एसयूव्ही 6-सीटर आणि 7-सीटर व्हर्जनमध्ये उपलब्ध होईल. हेक्टर प्लसमध्ये देखील हेक्टरचेच 1.5-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल आणि 2.0-लीटर डिझेल इंजिन मिळेल. ही नवीन एसयूव्ही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment