रिझर्व्ह बँकेने कर्जदारांची ईएमआय भरण्याची मुदत तीन महिन्यांनी वाढवली


नवी दिल्ली – भारतीय रिझर्व्ह बँकेचे शक्तीकांत दास यांनी आज पत्रकार परिषद घेत अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या दृष्टीने काही महत्वाचे यामध्ये त्यांनी निर्णय घेतल्याचे जाहिर केले आहे. त्याचबरोबर त्यांनी यावेळी रेपो रेट कमी करण्यासोबतच कर्जदारांना मोठा दिलासा दिला.

रिझर्व्ह बँकेकडून लॉकडाऊनच्या काळात कामधंदा नसल्यामुळे घरीच असलेल्या सर्वसामान्य नोकरदारांवरील कर्जाच्या हप्त्याचे ओझे वाढू नये यासाठी ईएमआयच्या हफ्त्यांसाठी तीन महिन्यांची मुदत देण्यात यापूर्वी देण्यात आली होती. त्या मुदतीत आता आणखी तीन महिन्यांची वाढ करण्यात आली आहे. ही सवलत आधी मार्च, एप्रिल, मे महिन्यासाठी देण्यात आली होती. पण आता याला आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. म्हणजे जून, जुलै आणि ऑगस्टपर्यंत कर्जाचा हप्ता न भरण्याची मुभा असेल. कर्जांवरील व्याज भरण्यास दिलेली स्थगिती आणखी तीन महिन्यांनी वाढवण्यात आलेली आहे.

जगभरातील आर्थिक घडामोडींवर कोरोनाच्या संकटाचा परिणाम झाला आहे. जगभरातील अर्थव्यस्थेचे कोरोनामुळे मोठे नुकसान झाले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेपो दरात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. रेपो दरात ४० बेसिस पॉईंट्सची कपात करण्यात आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. रेपो दर कपातीमुळे सामान्यांना दिलास मिळणार असून कर्जावरील व्याज कमी होणार आहे. आज सकाळी रेपो रेट संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी महत्वाची घोषणा केली आहे.

Leave a Comment