लवकरच बाजारपेठेत दाखल होणार धाकड मेड इन इंडिया इलेक्ट्रिक बाईक

इलेक्ट्रिक दुचाकी कंपनी ओकिनावा आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक या वर्षी अखेपर्यंत लाँच करणार आहे. कंपनी ओकी100 नावाने आपली इलेक्ट्रिक बाईक भारतीय बाजारात उतरवणार आहे. कंपनीने दावा केला आहे की बॅटरी सेल्ससोडून या इलेक्ट्रिक बाईकचे सर्व पार्ट्स भारतात निर्माण केले आहेत. या इलेक्ट्रिक बाईकचा टॉप स्पीड ताशी 100 किमी आहे. यात लिथियम-आयन बॅटरी बेस देण्यात आला आहे.

Image credited – Times Now

ओकिनावाचे एमडी जितेंदर शर्मा म्हणाले की, सध्या ओकिनावा इलेक्ट्रिक बाईकची 88 टक्के निर्मिती स्थानिक आहे. जी 100 टक्क्यांपर्यंत नेण्याचा विचार आहे. याचे सर्व पार्ट्स देशात बनविण्यात आले असून, स्थानिक पुरवठादाराकडून घेण्यात आलेले आहेत. कंपनी आपला सप्लायर्स बेस देखील वाढवणार आहे.

Image Credited – ZigWheels

दरम्यान, ओकिनावाने आपल्या इलेक्ट्रिक बाईकचा प्रोटोटाइप वर्ष 2018 ऑटो एक्स्पोमध्ये सादर केला होता. या इलेक्ट्रिक बाईकमध्ये 150 किमी ड्रायव्हिंग रेंज मिळू शकते. तसेच बॅटरी अवघ्या 2 तासात फूल चार्ज होईल. कंपनीने अद्याप बाईकच्या किंमतीबाबत माहिती दिलेली नाही.

Leave a Comment