या पंतप्रधानांचा 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याचा प्रस्ताव

न्यूझीलंडच्या पंतप्रधान जसिंडा अर्डर्न यांचे देशात कोरोना व्हायरसवर नियत्रंण मिळविण्यासाठी अनेकांनी कौतूक केले आहे. कोरोनावर मात करत त्यांनी देशात उद्योग-धंदे देखील पुन्हा सुरू केले आहेत. आता जसिंडा यांनी कर्मचाऱ्यांसाठी 4 दिवसांचा कामाचा आठवडा करण्याविषयी सुचवले आहे. चार दिवसांचा कामाचा आठवडा केल्याने पर्यटनाला चालना मिळेल व महामारीमध्ये झालेल्या नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत मिळेल, असे जसिंडा यांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान जसिंडा म्हणाल्या की, कोरोना व्हायरसनंतर न्यूझीलंड नक्कीच 4 दिवसांच्या आठवड्याचा विचार करेल. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ही चांगली योजना असेल व पर्यटनला देखील चालना मिळेल. त्या फेसबुक लाईव्हमध्ये बोलत होत्या.

त्यांनी स्पष्ट केले की, 4 दिवसांच्या कामाच्या आठवड्याचा निर्णय हा कर्मचारी आणि कंपनीचा असेल. या मॉडेलविषयी धाडस करावे लागेल व हीच पुनर्रचना करण्याची मोठी संधी आहे.

Leave a Comment