मुंबई उच्च न्यायालयाचा गँगस्टर अरूण गवळीला दणका


मुंबई – मुंबई उच्च न्यायालयाने कुप्रसिद्ध गँगस्टर अरूण गवळीला मोठा दणका दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरूण गवळीला पॅरोल वाढवून मिळणार नसल्याचे सांगत त्याने ताबडतोब तळोजा कारागृहात सरेंडर होण्याचे निर्देश दिले आहेत.

नुकताच अरूण गवळीच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला होता. त्याला या विवाहासाठी पॅरोल देण्यात आला होता. पण त्यानंतर आता अरूण गवळीने पॅरोल वाढवून मिळावा, अशी मागणी केली होती. त्याने यावेळी माझी गेल्या काही दिवसांतील वागणूक चांगली असल्याचे कारण देत पॅरोलमध्ये वाढ करण्यात यावी, अशी मागणी गवळीने केली होती.

न्यायालयाने अरूण गवळीची मागणी फेटाळली आहे, त्याचबरोबर नागपुरच्या सेंट्रल जेलमध्ये असणाऱ्या अरूण गवळीला तळोजाच्या जेलला सरेंडर होण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. दुसरीकडे पॅरोल वाढवून देण्यासाठी फक्त वागणूक चांगली आहे हे एकमेव कारण असू शकत नाही, त्याचबरोबर कायद्यात अशी कोणतीही तरतूद नसल्याचे न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.

Leave a Comment