पीपीई किट निर्मितीत भारत जगातील दुसरा सर्वात मोठा देश

कोरोनाग्रस्तांचा भारतातील आकडा एक लाखांच्या पुढे गेला असून, दिवसेंदिवस हा आकडा वाढतच चालला आहे. मात्र असे असले तरी भारत कोरोना टेस्टिंग आणि व्यक्तीगत संरक्षण उपकरण (पीपीई) किट निर्मितीच्या बाबतीत पुढे आहे. भारत आता पीपीई किटच्या निर्मितीमध्ये चीननंतर दुसरा सर्वात मोठा देश झाला आहे. खास गोष्ट म्हणजे भारत केवळ दोन महिन्यांच्या आत सर्वाधिक पीपीई किट निर्माण करणारा दुसरा देश बनला आहे. या संदर्भात अमर उजालाने वृत्त दिले आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालयाने सांगितले की, सरकारने पीपीई किटची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी महत्त्वाची पावले उचलली आहेत. आता पीपीईच्या निर्मितीबाबत भारत केवळ चीनच्या मागे आहे. मंत्रालय हे देखील सुनिश्चित करत आहे की सप्लाय चेनमध्ये केवळ प्रमाणित कंपन्याच पीपीईचा पुरवठा करेल.

Leave a Comment