उलटे चालण्याचे (Reverse Walking) हे आहेत फायदे

चालणे हा शरीरासाठी सर्वोत्तम असा व्यायाम कधीही व कोठेही करता येतो. दररोज काही मिनिटे चालणे शरीर व आरोग्यासाठी चांगले आहे. मात्र काहीवेळा या व्यायामामध्ये बदल करणे देखील फायदेशीर ठरते. उलटे चालण्याचे देखील शरीराला अधिक फायदे होतात. स्पोर्ट्स मेडिसिन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार उलटे चालणे आणि धावणे हा चांगला कार्डिओ आहे. याचा वजन कमी करण्यासाठी आणि शारीरिक रचनेसाठी देखील फायदा होतात. असेच काही उलटे चालण्याचे फायदे जाणून घेऊया.

समन्वयात सुधारणा –

अदिदास कंपनीनुसार उलटे चालणे समन्वय सुधरवते. उलटे चालत असताना आपण नेहमी पेक्षा वेगळी क्रिया करत असतो, त्यामुळे अशा स्थितीत शरीराचा समन्वय साधणे गरजेचे असते. तुमच्या मेंदूने योग्यरित्या तुम्हाला सुचना देणे आवश्यक आहेत. यासोबतच ध्यान केंद्रीत करण्यास मदत करते.

पायांची ताकद वाढते –

सर्वसाधारणपणे आपण सरळ चालतो, त्यावेळी पायांच्या पुढील स्नायूंवर परिणाम होता. मात्र मागील स्नायूंवर याचा परिणाम होत नाही. मात्र जेव्हा तुम्ही उलटे चालता, त्यावेळी या स्नायूंची देखील हालचाल होते व पाय अधिक मजबूत होतात.

गुडघ्यांवर कमी ताण येतो –

एमसी मस्क्यूलोस्केलेटल डिसऑर्डर जर्नलमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार, ज्या लोकांच्या गुडघ्यात वेदना होतात, अथवा दुखापत झालेली असते अशी लोक उलटे चालू शकतात. ज्यामुळे गुडघ्यांवर अधिक ताण पडणार नाही.

आरोग्यावर परिणाम –

जर्नल फिजिकल थेरेपीनुसार, उलटे चालल्याने समतोल वाढतो व हार्मोन्सची निर्मिती करते, जे तुमच्या संवेदना शांत करतात.

पाठदुखीची समस्या होत नाही –

हॅमस्ट्रिंग्सची समस्या तुमच्या पाठदुखीचे कारण ठरू शकते. हे टाळण्यासाठी दररोज 15 मिनिटे चालणे फायदेशीर ठरते. यासोबतच आणखी एक फायदा म्हणजे वजन कमी होण्यास देखील यामुळे फायदा होतो.

उलटे चालताना घेण्याची काळजी –

ट्रेडमिलवर उलटे चालत असाल तर वेग कमी ठेवा, अन्यथा तुम्ही घसरून पडू शकता. घरात उलटे चालत असाल तर आजुबाजूला फर्निचर अथवा इतर वस्तू नसतील याची काळजी घ्या. पायाच्या टाचा सुरक्षित ठेवण्यासाठी बुट घाला. बाहेर उलटे चालत असाल तर प्राणी, व्यक्ती, खड्डे या गोष्टींची काळजी घ्या.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment