आश्चर्यच ! या पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या देत आहेत हिरवे बलक असलेली अंडी

सर्वसाधारणपणे कोंबडीच्या अंड्याचा बाहेरील भाग पांढरा आणि आतील भाग पिवळा (बलक) असतो. मात्र सध्या सोशल मीडियावर हिरव्या रंगाचे बलक असलेल्या कोंबडीच्या अंड्यांचा फोटा व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून सर्वचजण आश्चर्यचकित होत आहेत.

केरळमधील मलापुरम येथे राहणाऱ्या एके शिहाबुद्दीन यांनी आपल्या पोल्ट्री फार्ममधील एका कोंबडीच्या अंड्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. त्यांच्या फार्ममधील कोबंड्या हिरव्या रंगांचे बलक असलेली अंडी देत आहेत.

പച്ചക്കരുവുള്ള കോഴിമുട്ട… ഒറിജിനൽ. എന്റ വീട്ടിലെ കോഴികൾ വേറെ ലെവലാ…Thanks God… its a genetic engineering result from my farm.

Posted by Shihabudheen Ak on Monday, May 4, 2020

याबाबत शिहाबुद्दीन यांनी सांगितले की, काही दिवसांपुर्वी मी माझ्या मित्रांना या अंड्यांबाबत सांगत होतो. ते देखील याबाबत जाणून घेण्यास उत्सुक होते. 9 महिन्यांपुर्वी असे अंडे कोंबडीने दिले होते. सुरूवातीला आम्ही देखील आश्चर्यचकित झालो व हे अंडे आम्ही खाल्ले नाही. कोंबडीने दिलेली सर्वच अंडी अशी असल्याने आम्ही त्याच्या पिल्लांची वाट पाहिली. या अंड्यांमधून बाहेर पडलेल्या 6 पिल्लांनी देखील अशाच प्रकारे हिरव्या रंगाचे बलक असलेली अंडी देण्यास सुरूवात केली. यानंतर त्यांच्या कुटुंबाने ही अंडी खाण्यास सुरूवात केली. सर्वसाधारण अंड्यांप्रमाणेच याची चव असल्याचे त्यांनी सांगितले.

Green yolk Egg Bullseye first video / photo This video is uploaded because many videos have been added with the fake bullseye photos of the green yolk egg.പച്ച മുട്ട ബുൾസൈ first video / ഫോട്ടോ പച്ചമുട്ടയുടെ വ്യാജ ബുൾസൈ ഫോട്ടോകൾ ചേർത്ത് പല വിഡിയോകളും ശ്രദ്ധയിൽ പെട്ടതിനാലാണ് ഇങ്ങനെ ഒരു video അപ്‌ലോഡ് ചെയ്യുന്നത്

Posted by Shihabudheen Ak on Saturday, May 16, 2020

ही माहिती सर्वत्र पसरल्यानंतर केरळ पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान यूनिव्हर्सिटीने देखील शिहाबुद्दीन यांच्या फार्मला भेट दिली. यूनिव्हर्सिटीच्या तज्ञांनी यासाठी काही चाचण्या देखील केल्या. पोल्ट्री सायन्सचे असिस्टंट प्रो. डॉ. एस शंकरलिंगम म्हणाले की, ही एक दुर्मिळ गोष्ट आहे. या कोबड्यांना खाण्यासाठी देण्यात आलेल्या धान्यामुळे कदाचित हे झाले असावे. मात्र शिहाबुद्दीन यांनी सर्व कोबड्यांना समानच खाद्य देत असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment