आमच्या पित्याच्या हत्यारांना माफ करा, जमाल खाशोगी यांच्या मुलाचे ट्विट

सौदी अरेबियाचे पत्रकार जमाल खाशोगी यांची तुर्की येथील सौदीच्या दुतावासात हत्या करण्यात आली होती. आता खाशोगी यांचा मुलगा सलाह खाशोगीने आपण वडिलांची हत्या करणाऱ्यांना माफ केले असल्याचे म्हटले आहे.

सलाह खाशोगीने ट्विट केले की,  आम्ही शहीद जमाल खाशोगी यांचे पुत्र घोषणा करतो की आम्ही त्या लोकांना माफ व क्षमा करतो, ज्यांनी आमच्या वडिलांची हत्या केली.

मात्र सौदी अरेबियात राहणाऱ्या सलाहच्या या ट्विटमुळे कायदेशीर परिणाम काय होतील, हे अद्याप स्पष्ट नाही. 2 ऑक्टोंबर 2018 ला इस्तांबूलच्या सौदी दुतावासात त्यांची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाची आंतरराष्ट्रीय स्तरावर विशेष चर्चा झाली होती. या हत्येमध्ये 15 एजेंटचा समावेश होता, ज्यांना रियादवरून पाठवण्यात आले होते. खाशोगी यांचे शव अद्याप मिळालेली नाही. या प्रकरणात 11 पैकी 5 जणांना मृत्यूदंड, 3 जणांना 24 वर्षांच्या कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे व अन्य लोकांना निर्दोष सोडण्यात आल्याची माहिती सरकारी वकिलांनी दिली.

सलाह खाशोगीने या आधी न्यायप्रणालीवर पुर्ण विश्वास असल्याचे म्हटले होते. सीआयए आणि संयुक्त राष्ट्राच्या विशेष दुतांनी या हत्येचा थेट संबंध सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी जोडला होता. मात्र सौदी सरकारने हे आरोप फेटाळले होते.

Leave a Comment