बोगस आरोग्य कर्मचारी पाठवत ‘कोरोना-औषध’ सांगून पत्नीच्या प्रियकर आणि कुटुंबाला पाजले विष

दिल्लीमध्ये हत्येचे षडयंत्र रचल्याचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीच्या कथित प्रियकराला विष देण्यासाठी चक्क कोरोनाची मदत घेतली आहे. प्रदीप नावाच्या व्यक्तीने पत्नीच्या प्रियकरला विष देण्यासाठी बनावट कोव्हिड-19 आरोग्य कर्मचाऱ्यांची नेमणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या व्यक्तीला त्याच्या पत्नीचे होमगार्डसोबत संबंध असल्याचा संशय होता. त्यामुळे त्याने बदला घेण्यासाठी हे पाऊल उचलले.

दोन महिला आरोग्य कर्मचारी बनून पीडित व्यक्तीच्या दिल्ली येथील अलिपूर भागातील घरी गेल्या. या महिलांनी होमगार्ड व त्यांच्या कुटुंबाला कोरोनापासून वाचण्यासाठी विष असलेले औषध दिले. हे औषध घेतल्यानंतर ते सर्वजण आजारी पडले.

पोलिसांनुसार, या कुटुंबाने औषध घेतल्यानंतर ते आजारी पडले. यानंतर त्यांनी शेजारच्यांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये धाव घेतली. ते आता बरे होत आहेत. पोलिसांना सीसीटिव्हीच्या मदतीने या महिलांची ओळख पटली असून, त्यांना अटक करण्यात आली आहे. या दोन्ही महिला प्रदीपच्या दुकानात काम करतात. त्यांनी कुटुंबाला विष देण्यासाठी दोघींना प्रत्येकी 200 रुपये दिले होते. आरोपीला अटक करण्यात आले असून, त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment