व्हिडीओ : जमावाने लुटले गरीबाचे 30 हजार रुपयांचे आंबे

लॉकडाऊनमुळे दोन महिने दुकाने बंद ठेवल्यानंतर आता पुन्हा एकदा व्यवसायिक, विक्रेत आपला धंदा पुर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र अनेक ठिकाणी सामान लुटण्याच्या घटना समोर येत आहेत. दिल्लीच्या जगतपुरी भागातील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत असून, या व्हिडीओमध्ये लोक फळ विक्रेतच्या क्रेट्समधून आंबे लुटून नेत असल्याचे दिसत आहे. या घटनेमध्ये फळविक्रेत्याचे मोठे नुकसान झाले आहे.

छोटे नावाच्या व्यक्तीने आंब्यांच्या हातगाडी लावली होती. मात्र आजुबाजूच्या काही लोकांनी त्याला त्याची हातगाडी तेथून हटविण्यास सांगितले. या लोकांशी वाद घालत असताना, अचानक काही आजुबाजूच्या लोकांनी या परिस्थितीचा फायदा घेत पेटीमध्ये ठेवलेले आंबे लंपास करण्यास सुरूवात केली.

डझनभर लोकांनी यावेळी आंबे चोरी केले. काहीजण हेल्मेटमध्ये टाकून आंबे नेत होते, तर काहीजण इतरांना देखील आंबे चोरी करण्यास सांगत होते. छोटेने सांगितले की, माझ्याजवळ 30 हजार रुपयांचे 15 क्रेट्स आंबे होते. त्यांनी सर्वकाही नेले.  या घटनेची पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Comment