धक्कादायक : कोरोनाचे शरीरावर परिणाम, या व्यक्तीने शेअर केले स्वतःचे फोटो

अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील कोरोना व्हायरसपासून बचावलेल्या एका व्यक्तीने आपल्या शरीराचा धक्कादायक फोटो शेअर केला आहे. माईक शुल्टझचे हॉस्पिटलमध्ये 6 आठवडे असताना 20 किलो वजन कमी झाले. इंस्टाग्रामवर कोरोना होण्याच्या आधीचा व कोरोनातून बरे झाल्यानंतरचा फोटो शेअर करण्यात आला आहे.

माईकने सांगितले की, हॉस्पिटलमध्ये त्याला हा फोटो काढायचा नव्हता. मात्र हा आजार कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे या संदर्भात लोकांना सावध करण्यासाठी त्याने हे फोटो सोशल मीडियावर टाकले. कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याआधी त्याचे वजन 86 किलो होते, मात्र नंतर हे वजन कमी होऊन 63 किलो झाले.

त्याने सांगितले की, 6 आठवडे व्हेंटिलेटरवर राहिल्यानंतर काय होऊ शकते हे मला सर्वांना दाखवायचे होते. या आजारामुळे माझ्या फुफ्फुसांची क्षमता देखील कमी झाली.

माईक आठवड्यातून 6-7 वेळा व्यायाम करत असे व याआधी त्याला कोणता आजारही नव्हता. मात्र मार्च महिन्यात मायामी येथील बीच पार्टी दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. 16 मार्चला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर त्याच्यावर न्यूमोनियाचे उपचार करण्यात आले व त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. स्वतःहून श्वास घेण्यासाठी त्याला साडेचार आठवडे लागले. शरीरात झालेला हा बदल बघून मी स्वतःला ओळखूच शकलो नाही. आरशात पाहून मी रडलो सुद्धा, असे माईक म्हणाला.

Leave a Comment