कॉफी कधी प्यावी?


चहा किंवा कॉफी ही उत्तेजक पेये आहेत. आपण रात्री भरपूर झोप घेऊन सकाळी उठतो तेव्हा झोप झालेली असली तरी आपण पुरेसे फे्रश झालेलो नसतो थोडासा आळस अंगात राहिलेला असतो आणि भराभर कामे करण्याचा उत्साह अंगात आलेला नसतो. अशा वेळी एखादे उत्तेजक पेय घ्यावेसे वाटते आणि ते घेतले की एकदम फ्रेश वाटते. निदान आपला तसा समज तरी असतो. म्हणून कोणीही आपल्या दिवसाची सुरूवात चहा किंवा कॉफीच्या एका कपाने करत असतो. परंतु शास्त्रज्ञांनी आता सकाळच्या या उत्तेजक पेयाचा विशेषतः कॉफीचा आपल्या शरीरावर खरोखर किती परिणाम होत असतो याचा अभ्यास केला असून सकाळची उठल्याबरोबरची वेळ ही कॉफी पिण्यास योग्य नाही असा निष्कर्ष काढला आहे.

या संशोधनाचा संबंध आपल्या शरीरातल्या विविध हार्मोन्सशी आहे. आपल्या शरीरात अनेक हार्मोन्स निर्माण होत असतात हे हार्मोन्स म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची रसायने असतात. त्यातील कार्टिझोन हे हार्मोन आपल्याला फ्रेश वाटण्याच्या बाबतीत सर्वाधिक परिणामकारक असते. तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर थोडे फे्रश वाटते याचे कारण त्यावेळी शरीरामध्ये कार्टिझोन मोठ्या प्रमाणावर स्रवलेले असते. केवळ सकाळीच नव्हे तर दिवसाच्या काही विशिष्ट काळातसुध्दा ते कमीजास्त होत असते. तेव्हा आपल्या शरीराचे जे जैविक घड्याळ असते त्या घड्याळाचा आणि आपल्या जागे राहण्याचा, झोपण्याचा आणि फ्रेश वाटण्याचा संबंध असतो. तेव्हा हे जैविक घड्याळ आणि कार्टिझोन मोठ्या प्रमाणावर स्रवण्याची वेळ यांचा विचार करून कॉफी पिली पाहिजे.

सकाळी आपण सात वाजता उठतो तेव्हा कार्टिझोल स्रवण्याची प्रक्रिया सुरू होते आणि सकाळी ८ ते ९ या वेळेमध्ये सकाळी कार्टिझोल कमाल क्षमतेने उपलब्ध असते. ते जोपर्यंत कमाल क्षमतेने उपलब्ध आहे तोपर्यंत कॉफी पिऊ नये. कारण एकतर तिची गरज नाही आणि तरीही आपण कॉफी प्यालो तरी कॉफीचा परिणाम म्हणावा तसा होत नाही. शिवाय काही हे शरीरातले कार्टिझोल कॉफीचा प्रतिकार करण्याची शक्यता असते. तेव्हा सकाळची पहिली कॉफी ९.३० वाजता झाली पाहिजे. दुसरी कॉफी दीड वाजता आणि तिसरी सायंकाळी ७ नंतर झाली पाहिजे. तर कॉफीचा योग्य तो परिणाम आपल्याला जाणवतो.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment