कोरोनाच्या संकटातही चीन वाढवत आहे सैन्यबळ

कोरोना व्हायरस महामारीच्या काळात चीनने या वर्षी आपल्या संरक्षण बजेटमध्ये 6.6 टक्क्यांनी वाढ केली आहे. चीन संसदेच्या वार्षिक बैठकीत जारी केलेल्या रिपोर्टमध्ये ही माहिती समोर आली. मात्र चीनची सैन्य खर्चातील वाढ मागील वर्षीच्या तुलनेत कमी आहे. 2019 मध्ये चीनने संरक्षण बजेटमध्ये 7.5 टक्क्यांनी वाढ केली होती.

चीनने सैन्य खर्चासाठी 178.11 अब्ज डॉलर रक्कम निश्चित केली आहे. या बजेटवरून चीन सैन्य ताकद वाढवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. मागील वर्षीच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत 2020 च्या तिमाहीमधील अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी घटली आहे.

मागील काही काळात अमेरिका-चीनमध्ये तणाव वाढला आहे. भारत-चीन सीमेवर देखील छोट्या-मोठ्या घटना घडत आहेत. कोरोना व्हायरस महामारी आणि अर्थव्यवस्थेसमोरील आव्हान असताना देखील चीन दक्षिण चीन सागर आणि तायवानमध्ये अमेरिकेला आव्हान देत आहे. चीन नेहमीच संरक्षण बजेटची आकडेवारी खोटी देत आले असून, जीडीपीच्या तुलनेत हा आकडा जास्त नसल्याचे चीनचे म्हणणे आहे. चीनी सैन्य खर्चाचे केवळ वरवरचे आकडेवारी देते. तज्ञांनुसार, चीन असे खरी माहिती लपविण्यासाठी करते.

चीनचा 2020 चे संरक्षण बजेट अमेरिकेच्या मागील वर्षीच्या संरक्षण बजेट पेक्षा एक चतृतांश होते. अमेरिकेचे मागील वर्षी संरक्षण बजेट 686 अब्ज डॉलर होते. चीन मागील अनेक वर्षांपासून अमेरिकेची बरोबरी करण्यासाठी संरक्षण बजेट वाढवत आहे. विश्लेषकांनुसार, चीनच्या संरक्षण बजेटमधील वाढीमुळे अर्थव्यस्थेला मदत मिळू शकते. कोरोना व्हायरसमुळे चीनमध्ये उत्पादकांना मोठे नुकसान झाले आहे.

Leave a Comment