स्विगी-झोमॅटोला तगडी टक्कर देणार आता अ‍ॅमेझॉन फूड डिलिव्हरी

अ‍ॅमेझॉन इंडियाने भारतात आपली फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. अ‍ॅमेझॉनची ही सेवा थेट स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांना टक्कर देणार आहे. अ‍ॅमेझॉन फूड डिलिव्हरीची सुरूवात बंगळुरूमधून झाली असून, यासाठी कंपनीने स्थानिक हॉटेलशी भागीदारी केली आहे.

अ‍ॅमेझॉनने दावा केला आहे की, ज्या हॉटेलशी भागीदारी केली आहे, त्यांच्या येथे साफसफाई-स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जात आहे. कंपनीने यासाठी सर्टिफिकेट देखील जारी केले आहेत. संसर्ग रोखण्यासाठी कंपनी हायजीनबाबत हाय-स्टँडर्ड नियम पाळत आहे.

अ‍ॅमेझॉनच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, कंपनीने ग्राहकांच्या प्रतिक्रियेच्या आधारावर फूड डिलिव्हरी सेवा सुरू केली आहे. नवीन सेवेचा उद्देश स्थानिक व्यवसायांना मदत करणे आहे. बंगळुरूमध्ये ही सेवा 560048, 560037, 560066 आणि 560103 या पिनकोडवर उपलब्ध आहे. मात्र कंपनीने हॉटेल्सची लिस्ट जारी केलेली नाही.

Leave a Comment