पाऊस नियंत्रणाची पॉवर असलेली राणी

फोटो साभार एनडीटीव्ही

सनातन हिंदू धर्मात देवांचा राजा इंद्र याला पावसाची देवता मानले जाते. वरूण हाही पावसाचा देव. म्हणजे अतिवृष्टी करायची की बेताच पाऊस पडायचा ते या देवांच्या हातात. द. आफ्रिकेतील लीम्पोपो येथील आदिवासी समुदायात राणीकडे पावसावर नियंत्रण ठेवण्याची शक्ती असते असे मानले जाते. आता त्यांची होणारी राणी मसलानाबो मोजदिजी ही खरोखरच या शक्तीचे दर्शन घडवेल काय याकडे येथील समुदायाचे लक्ष लागले आहे.

द. अफिर्केत हे असे एकमेव राज्य आहे ज्याची सत्ता राणीच्या हातात आहे. नवीन येणारी राणी २०२३ मध्ये सत्ता हाती घेणार आहे. आत्ता ही राणी म्हणजे मासालानाबो केवळ १६ वर्षाची आहे आणि १८ वर्षांची झाल्यावर तिला राणीपद आणि राज्याची सत्ता मिळणार आहे.

४०० वर्षांपूर्वी येथले आदिवासी झिंबाब्वे येथून आले तेव्हा पुरुष राज्यकर्ते होते म्हणजे या राज्याला राजा होता. पण ते सारखे लढाया करत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर माणसे मारत असत. शेवटच्या राजाच्या स्वप्नात एका ईश्वरीय ताकदीने त्याला यापुढे राणी येथे राज्य करेल आणि तिच्याकडे पावसावर नियंत्रण मिळविण्याची शक्ती असेल असा दृष्टांत दिला तेव्हापासून येथे राणी राज्य सुरु झाले.

खरोखरच राणी राज्य आल्यावर लढाया संपल्या. राज्यात सुधारणा झाल्या. दुसरे राजे येथे येउन राणीला त्यांच्या राज्यात पाऊस पाड अश्या विनवण्या करू लागले. पण राणीचे आयुष्य फार सोपे नव्हते. तिला त्यासाठी जंगलात एकटे राहून आपले वेगळेपण सिध्द करावे लागत असे. कालांतराने ही राणी राज्याची प्रथा बंद पडली होती. राणी होती पण तिला अधिकार नव्हते. ती केवळ नामधारी राणी असायची. पण द. आफ्रिकेचे माजी अध्यक्ष जाकोब झुमा यांनी ही प्रथा पुन्हा सुरु केली.

आता २०२३ मध्ये सत्तेवर येणारी मसालानाबो ५० वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा सत्ताधारी राणी बनेल. यापूर्वीच्या तीन राण्या केवळ नामधारी होत्या. आता मसालानाबो कडेही पावसाला नियंत्रित करण्याची शक्ती आहे काय याची प्रतीक्षा केली जात आहे.

Leave a Comment