आफ्फान वादळात गांगुलीच्या घरातला आम्रवृक्ष कोसळला

फोटो साभार नई दुनिया

पश्चिम बंगाल आणि ओरिसा राज्यांना जबरदस्त तडाखा देऊन मोठे नुकसान केलेल्या आफ्फान चक्रीवादळाचा तडाखा बीसीसीआयचा अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कप्तान सौरव गांगुली याला बसला आहे. या वादळामुळे सौरवच्या घरातील आम्रवृक्ष कोसळला. पण सौरवने काही लोकांच्या मदतीने हे कोसळलेले झाड उभे करून पुन्हा त्याचे रोपण केले आहे. सौरवने त्या संदर्भात काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

या फोटो मध्ये सौरवच्या घरात अंगणात हे झाड पडलेले दिसत असून सौरव घराच्या गच्चीतून काही माणसांच्या मदतीने दोरीच्या सहाय्याने ते वर उचलण्याचा प्रयत्न करताना दिसतो आहे. बंगाल मध्ये या वादळाने ७२ लोक मृत्युमुखी पडले असून हजारो बेघर झाले आहेत. अनेक पूल पडले आहेत आणि खालच्या पातळीवर असलेल्या वस्त्यातून पाणी शिरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी वादळाचा तडाखा बसलेल्या बंगाल आणि ओरीसाच्या प्रदेशची हवाई पाहणी केली असून करोना लॉकडाऊन मध्ये मोदी ८३ दिवसांनंतर प्रथम दिल्ली बाहेर पडले आहेत.

Leave a Comment