तृतीयपंथी समाजाकडून निलेश राणेंविरोधात गुन्हा दाखल


जळगाव – जळगावातील तृतीयपंथी समाजाकडून माजी खासदार निलेश राणे यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून निलेश राणे यांनी राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना उद्देशून टीका केली होती. तृतीय पंथियांकडून त्यांनी त्यावेळी वापरलेल्या शब्दांवर आक्षेप घेण्यात आला आहे.

निलेश राणे यांच्याविरोधात जळगावच्या यावल तालुक्यातील फेजपूरच्या सामाजिक कार्यकर्ता भानुदास पाटील ऊर्फ शमिभा पाटील यांनी पोलिसांत तक्रार केली. तृतीयपंथी समाजावर उपहासात्मक आणि अब्रुनुकसानीकारक निलेश राणे यांनी वक्तव्य केल्याची प्रतिक्रिया शमिभा पाटील यांच्याकडून देण्यात आली आहे. पण निलेश राणे यांनी याप्रकरणी ट्विटरवर दिलगिरी व्यक्त केली आहे.


दरम्यान, तृतीयपंथीयांच्या भावना मी जर दुखावल्या असतील तर त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. एका व्यक्तीवर माझा रोख होता इतर कोणावर नाही. पण माझ्यावर तुम्ही गुन्हा दाखल केला तरी चालेल कारण माझा उद्देश तुम्हाला दुखावण्याचा कधीच नसल्याचे निलेश राणे म्हणाले आहेत.

Leave a Comment