भारतीय युजर्ससाठी फेसबुककडून प्रोफाइल लॉक फिचर रोलआउट


भारतातील आपल्या युजर्ससाठी खासकरुन फेसबुकने एक नवे फिचर रोलआउट केले आहे. या फिचरचे नाव प्रोफाइल लॉक असे असून याच्या मदतीने युजर्सला फेसबुकमधील फ्रेंडलिस्टमध्ये असणाऱ्या मित्रमैत्रीणींव्यतिरिक्त अन्य कोणाला तुमची पोस्ट किंवा फोटोज पाहता येणार नाही आहेत. तसेच तुम्ही शेअर केलेली पोस्ट फक्त मैत्रपरिवारालाच दिसणार आहेत. फेसबुकने हे फिचर खासकरुन महिलांची सुरक्षितता लक्षात घेता रोलआउट केले आहे. हे फिचर फक्त भारतीय युजर्ससाठी लॉन्च करण्यात आले आहे. हे फिचर येत्या काही आठवड्यात सर्व युजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

कंपनीने प्रोफाईल लॉक फिचर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पिक्चर गार्डनंतर जाहीर केले आहे. फेसबुकने काही महिन्यांपूर्वी प्रोफाइल पिक्चरच्या सुरक्षिततेसाठी सेफ्टी गार्ड फिचर रोलआउट केले होते. कोणत्याही युजर्सला या फिचरच्या मदतीने अन्य दुसऱ्या युजर्सचा फोटो डाउनलोड किंवा शेअर करता येत नाही. प्रोफाइल लॉक फिचर सुद्धा युजर्सची प्रायव्हेसी आणि सेफ्टीसाठी सोशल मीडिया कंपनीकडून उचलण्यात आलेले पाउल आहे. प्रोफाइल लॉक फिचर युजर्सला सेटिंग्स ऑप्शन येथे जाऊन सुरु करता येणार आहे. त्यानंतर युजर्सच्या प्रोफाइलची माहिती किंवा पोस्ट फक्त मित्रमैत्रिणींनाच दिसणार आहे.

कोणत्याही फेसबुक युजर्सला प्रोफाइल लॉक फिचर सुरु केल्यानंतर तुमचा प्रोफाइल फोटो दिसणार नाही. त्याचबरोबर प्रोफाइल संबंधित अन्य कोणतीही माहिती त्याला एक्सेस करता येणार नाही. तसेच तुमचे मित्रमैत्रिणीचे सुद्धा तुमच्या प्रोफाइलमधील माहिती आणि फोटो पाहू शकणार नाही. फेसबुकने हे प्रोफाइल लॉक फिचर युजर्सच्या मागणीमुळे रोलआउट केले आहे.

Leave a Comment