बीएमडब्ल्यूच्या दोन बाईक्स भारतात सादर

फोटो साभार फायनान्शियल एक्सप्रेस

बीएमडब्ल्यूने भारतीय बाजारात दोन नव्या बाईक्स २१ मे रोजी सादर केल्या असून एफ ९०० सिरीज मधल्या या बाईक्स आहेत. ही सिरीज मिलान मधील २०१९ ईआयसीएमए मोटर शो मध्ये प्रदर्शित करण्यात आली होती. भारतात सादर केल्या गेलेल्या बाईक्सची नावे एफ ९०० आर आणि एफ ९०० एक्सआर अशी आहेत. लाँचिंग नंतर लगेचच या बाईकचे बुकिंग करता येणार आहे मात्र करोना मुळे त्यांची डिलीव्हरी मिळण्यास उशीर लागू शकतो असे सांगितले जात आहे.

एफ ९०० आर नवी स्ट्रीट नेकेड मोटरसायकल आहे तर एफ ९०० एक्सआर अँडव्हेंचर स्पोर्ट्स टूरर बाईक आहे. दोन्ही बाईक साठी एकच चासी आणि एकच प्रकारचे इंजिन दिले गेले आहे मात्र त्यांच्या स्टायलिंग, रायडिंग पोझिशन व सस्पेन्शन मध्ये वेगळेपण आहे.

या दोन्ही बाईकसाठी ८९५ सीसी इनलाईन ट्विन इंजिन सहा स्पीड गिअरबॉक्ससह दिले गेले आहे. एफ ९०० आरला ० ते १०० किमीचा वेग घेण्यास ३.६ सेकंड लागतात तर एफ ९०० एक्स आरसाठी हाच वेळ ३.७ सेकंड आहे. दोन्हीचा टॉप स्पीड ताशी २०० किलोमीटर आहे. या बाईक दोन व्हेरीयंट मध्ये असून बेस मॉडेल मध्ये रायडिंग मोड (रोड, रेन), ट्रॅक्शन कंट्रोल, ब्लू टूथ,६.५ इंची टीएफटी स्क्रीन, एलईडी हेडलाईट अशी फिचर्स आहेत.

टॉप व्हेरीयंट मध्ये कॉर्नरिंग एबीएस, की लेस इग्निशन सह अन्य फिचर्स दिली गेली आहेत. या दोन्ही बाईकच्या किमती अनुक्रमे ९.७ ते १० लाख आणि एक्सआर साठी ११ ते १२ लाख अश्या आहेत.

Leave a Comment