ऑनलाईन मागविलेले सामान स्वीकारताना घ्या ही काळजी

फोटो साभार द. हिंदू

देशात ३१ मे पर्यंत करोना नियंत्रणासाठी लागू केलेला लॉकडाऊन सुरु राहणार असला तरी ऑनलाईन ऑर्डर आणि होम डिलीव्हरीला परवानगी दिली गेली आहे. यात जीवनावश्यक वस्तू, औषधे, रोजचे गरजेचे सामान, भाजीपाला, फूड डिलीव्हरी साठी ऑनलाईन सेवा घेता येणार आहे. मात्र होम डिलीव्हरी घेताना काही सुरक्षा मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवणे आणि त्याप्रमाणे वागणे आवश्यक आहे.

होम डिलीव्हरी घेताना काही गोष्टी आवर्जून पाळायला हव्यात. पहिले म्हणजे डिलीव्हरी घेताना डिलीव्हरी बॉयशी संपर्क येऊ देऊ नये. त्यांना फोन करून दरवाज्याबाहेर पार्सल ठेवण्याच्या सूचना द्या आणि असे ठेवले गेलेले पार्सल थोड्या वेळानंतर घरात आणा. मागविलेल्या वस्तूंचे पैसे कॅश मध्ये न देता ऑनलाईन पेमेंटने द्या.

प्लास्टिक, स्टील सरफेसवर करोनाचा विषाणू ७२ तास राहू शकतो तर कार्डबोर्डवर २४ तास राहू शकतो. त्यामुळे बाजारातून आलेले सामान शक्य असेल तर घराबाहेर ठेवा अन्यथा ते स्वीकारताना मास्क, हँड ग्लोव्ज वापरा.

फूड डिलीव्हरी करणाऱ्याने मास्क लावलेला नसेल तर पार्सल स्वीकारू नका. डिलीव्हरी पार्सल ला हात लावल्यावर ताबडतोब साबणाने हात धुवा. पार्सल घेतल्याबरोबर हात लगेच डोळे, तोंड, नाक याना लावू नका. पार्सल शक्यतो सॅनीटाईज करा.

खायचे सामान मागविले असेल आणि ते पाण्याने धुणे शक्य असेल तर धुवा. अन्यथा पदार्थ गरम करून मगच खा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment