८०० वर्षे जुन्या केम्ब्रिज विद्यापीठात प्रथमच ऑनलाईन शिक्षण

फोटो साभार अल जझीरा

जगभरात प्रसिद्ध असलेल्या, जगाला अनेक गणिती, वैज्ञानिक, शास्त्रज्ञ दिलेल्या ब्रिटनच्या ८०० वर्षे जुन्या केम्ब्रिज विद्यापीठात पुढील सत्रापासून प्रथमच ऑनलाईन शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला असून येत्या ऑक्टोबर पासून सुरु होत असलेल्या सत्रापासून त्याची अंमलबजावणी केली जाईल असे समजते. ब्रिटन मधील अश्या प्रकारे ऑनलाईन शिक्षण देणारे हे पहिलेच विद्यापीठ ठरणार आहे. जगभरात प्रसार झालेल्या कोविड १९ विषाणूचा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेल्याचे समजते.

हॉवर्ड विद्यापीठाने जगभरातील विद्यार्थीवर्गाच्या सुविधेसाठी ६७ ऑनलाईन कोर्स सुरु केले असून हे सर्व कोर्स मोफत आहेत. १ ते १२ आठवडे मुदतीचे हे कोर्स आहेत. कोविड १९ साथीमुळे सोशल डीस्टन्सिंग पुढील काळातही पाळणे आवश्यक ठरल्याने केम्ब्रिज विद्यापीठाने विद्यार्थी नुकसान होऊ नये म्हणून ऑक्टोबर् २०२० पासून २०२१ च्या उन्हाळ्यापर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्याचे ठरविले असल्याचे सांगितले जात आहे.

अर्थात अगदी थोड्या संखेने असलेल्या ट्यूटोरीअल ग्रुप ना आमने सामने बसायची परवानगी दिली गेल्याचेही सांगितले जात आहे. विशेष म्हणजे कोरोना मुळे जगातील अनेक महाविद्यालये, विद्यापीठे ऑनलाईन शिक्षण देण्याचा विचार करत आहेत. अमेरिकेतील चार नंबरच्या कॅलिफोर्निया विद्यापिठाने ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरवात केली आहे.

Leave a Comment