सर्वात महागड्या आयफोन १२ साठी सॅमसंगचा डिस्प्ले

फोटो साभार न्यूज १८

अॅपल आयफोन १२ सिरीजवर काम करत असल्याचे स्पष्ट झाल्यापासून या फोनच्या डिझाईनबाबत तसेच किंमतीबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. या दरम्यान फोनच्या स्क्रीनबाबत नवीन माहिती समोर आली आहे. डिस्प्ले सप्लाय चेन कन्सलटंट (डीएससीसी) च्या रिपोर्ट नुसार अॅपल आयफोन सिरीज मध्ये चार मॉडेल लाँच करणार असून त्यातील तीन मॉडेलसाठी सॅमसंगचा डिस्प्ले असेल.

आयफोन १२, १२ मॅक्स, १२ प्रो आणि १२ प्रो मॅक्स या नावाने हे फोन येतील असेही समजते. या वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत ते लाँच होतील असा संकेत दिला गेला आहे. आयफोन १२ साठी ५.४ इंची स्क्रीन असून सॅमसंग ओलेड डिस्प्ले, १२ प्रो साठी ६.१ इंची सॅमसंग ओलेड डिस्प्ले असेल तर सर्वात महाग १२ प्रो मॅक्ससाठी ६.६८ इंची सॅमसंग फ्लेक्सिबल ओलेड पॅनल दिले जाईल. या फोन्स साठी ४४०० एमएएच बॅटरी दिली जाईल आणि विशेष म्हणजे आयफोनच्या आत्तापर्यंत आलेल्या फोन मध्ये ही सर्वात पॉवरफुल आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आयफोन १२चे बेस मॉडेल आयफोन ११ पेक्षा स्वस्त असेल. आयफोन १२ सिरीज अंदाजे ६०० ते ७०० डॉलर्स या किमतीत पेश केली जाईल. १२ प्रो साठी ६४ जीबी मेमरी, ६ जीबी रॅम, आणि ट्रिपल कॅमेरा सेट असेल असेही सूचित केले गेले आहे.

Leave a Comment