‘लॉकडाऊन, इंडिया फाईट करोना व्हायरस’, फिल्मचे उद्या प्रसारण

फोटो साभार एक्स्चेंज ४ मिडिया

कोविड १९ योद्ध्यांच्या साहसाची गाथा सांगणारी, लॉकडाऊनच्या काळातच अनोख्या पद्धतीने शूट केलेली ‘लॉकडाऊन, इंडिया फाईट करोना व्हायरस’ ही शॉर्ट फिल्म उद्या म्हणजे २२ मे रोजी रात्री ९ वाजता नॅट जिओ चॅनल वर प्रसारित केली जात आहे. यात भारतात कोविड १९ विरोधात अथक परिश्रम करत असलेले डॉक्टर्स, अन्य आरोग्य कर्मचारी, पोलीस, पत्रकार, सरकारी अधिकारी यांच्या साहसी प्रयासांचे दर्शन घडणार आहे.

नॅशनल जिओग्राफिकची निर्मिती असलेल्या या फिल्मचे शुटींग अनोख्या पद्धतीने झाले आहे. पीटीआयच्या बातमीनुसार करोना योद्धांच्या साहसाची ही प्रेरक कहाणी असून या साथीविरुद्ध लढताना त्यांनी केलेले प्रयास यात पाहायला मिळतील. हे सारे योद्धे सर्वसामान्य माणसाचे भविष्य वाचविण्यासाठी प्रयास करत आहेत. त्यामुळे हेच खरे हिरो आहेत.

सर्व सुरक्षा प्रोटोकॉल पाळून, सरकारी नियम लक्षात घेऊन या फिल्मचे शुटींग केले गेले आहे. त्यात सहभागी असलेले कोणीही त्यांच्या घराबाहेर पडले नाही. दिल्ली, मुंबई, सांगली, बंगलोर, चेन्नई, केरळच्या काही भागात याचा काही भाग शूट केला गेला आहे. त्यात आरोग्य अधिकारी, राज्य आयुक्त, कोविड १९ योद्ध्ये सामील झाले आहेत.

Leave a Comment