करोनामुळे अतिश्रीमंतांचा न्युयॉर्कला बायबाय

फोटो साभार भास्कर

करोना कोविड १९ मुळे अमेरिका सर्वाधिक बाधित देश बनला असून या देशात करोनाचा प्रभाव अजूनही तीव्र आहे. त्यातही न्युयॉर्क मध्ये कोविड १९ चा परिणाम अधिक जाणवत असून त्यामुळे या शहरातील श्रीमंत, अतिश्रीमंत व्यक्तीनी न्युयॉर्कला बायबाय करून अन्यत्र निवारा शोधला आहे. अर्थात हे श्रीमंत स्वतंत्र बेटे, महागडी ठिकाणे अश्याच जागी गेले आहेत.

मिळालेल्या आकडेवारीनुसार १ मार्च ते १ मे या काळात किमान ४ लाख २० लाख श्रीमंत न्युयॉर्क मधून बाहेर पडले आहेत. ही संख्या शहराच्या एकूण लोकसंख्येच्या ५ टक्के आहे. यात वर्षाला १६ कोटी पेक्षा अधिक अथवा त्यापेक्षा जास्त कमाई असणारयांचा समावेश आहे.

न्युयॉर्क विद्यापीठातील इतिहास तज्ञ प्रो. डॉ. किम फिलिप्स फेन यांच्या मते येथील प्रत्येक समुदायाचे वर्तन वेगळे आहे. न्युयॉर्क सोडून जाणाऱ्यात गोऱ्या लोकांचे प्रमाण अधिक आहे. वेस्ट व्हिलेज, अपर ईस्टसाईड, सोहो, ब्रुकलीन हाईट्स अश्या अतिश्रीमंत वस्तीतील ४० टक्के लोक न्युयॉर्क सोडून गेले आहेत. काही विद्यार्थीही सोडून गेले आहेत.

यातील बहुतेक जण द. फ्लोरिडा, कनेक्टीकट, पेनिन्सिल्व्हिया, न्यू जर्सी, विनयार्ड, केपक्रॉस, रोड आयलंड, हँपटन, हडसन व्हॅली अश्या ठिकाणी गेले असून तेथे त्यांना करोना विषाणू शरणार्थी असे म्हटले जात आहे.

———-

Leave a Comment