हे होऊ शकते कोरोनाचे मुख्य केंद्र, एकाच दिवसात 17 हजार केस

चीनच्या वुहान शहरातून सुरू झालेल्या कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. आता ब्राझीलमध्ये एकाच दिवसात तब्बल 17,408 नवीन रुग्ण आढळले आहेत व 1,179 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच मृतांचा आकडा 17,971 वर पोहचला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की वाईट काळ अद्याप गेलेला नसून, मे नंतर रुग्णांची संख्या अधिक वाढेल.

ब्राझीलमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 2,71,628 झाली असून, अमेरिका आणि रशियानंतर हा सर्वाधिक आकडा आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की जूनमध्ये व्हायरसचा संसर्ग अधिक वाढेल व अधिक टेस्टिंग न केल्यास याचा धोका अधिक वाढेल.

ब्राझीलचे राष्ट्रपती जायर बोसोनारो यांनी लॉकडाऊनला विरोध केला होता. त्यांनी कोरोनाला लहानसा आजार म्हणत, यामुळे अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान होत आहे, असे म्हटले होते. ब्राझीलच्या आरोग्य मंत्र्यांनुसार 1.46 लाख लोकांवर उपचार सुरू असून, 1.06 लोक बरे झाले आहेत. येथील प्रमुख शहर असलेले साओ पोलो आणि रियो डे जेनेरियोमध्ये क्रमशः 5,147 आणि 3,079 लोकांचा मृत्यू झाला आहे. येथील जवळपास 1.3 कोटी लोकसंख्या झोपडपट्टीत राहते. यामुळे हायजीन आणि सोशल डिस्टेंसिंग पाळणे अशक्य आहे.

Leave a Comment