कलयुग : व्हिडीओ कॉलवर दिली मृत्यूदंडाची शिक्षा

सिंगापूरमध्ये एका व्यक्तीला ड्रग डीलमध्ये सहभागी असल्याने न्यायालयाने चक्क झूम व्हिडीओ कॉलद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. सिंगापूरमध्ये अशाप्रकारे शिक्षा देण्याची ही पहिलीच वेळ आहे. 31 वर्षीय मलेशियाचा नागरिक असलेल्या पुनिथन गेनासनला 2011 च्या ड्रग्ज प्रकरणात ही शिक्षा मिळाली आहे. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन असल्याने सर्वांच्या सुरक्षेसाठी व्हिडीओ कॉन्फ्रेंसिंगद्वारे सुनावणी करण्यात आल्याची माहिती सिंगापूरच्या सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवक्त्यांनी दिली.

न्यायालयाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सिंगापूरमध्ये ऑनलाईन मृत्यूदंडाची शिक्षा देण्याची ही पहिलीच घटना आहे. तर पुनिथन गेनासनच्या वकिलांनी या निर्णयाला आव्हान देण्या असल्याचे म्हटले आहे.

मात्र दुसरीकडे मानवाधिकार संघटनांनी झूमद्वारे मृत्यूदंडाची शिक्षा दिल्याने टीका केली आहे. ह्युमन राईट्स वॉचचे आशिया विभागाचे उपसंचालक फिल रॉबर्टसन म्हणाले की, सिंगापूरची मृत्यूदंडाची शिक्षा ही क्रूर आणि अमानवीय आहे. झूम सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून व्यक्तीला मृत्यूदंड देणे हे अधिकच क्रूर बनवते.

Leave a Comment