… अन् पायलटने चक्क महामार्गावरच उतरवले विमान

विमान लँडिगच्या आधी इंजिनमध्ये बिघाड झाल्याने पायलटला अचानक महामार्गावर विमान उतरवावे लागल्याची घटना अमेरिकेतील मिसोरी येथे घडली आहे. पायलट ली समिट विमानतळावर विमान लँड करत होता, मात्र त्या आधीच विमानाच्या दोन पैकी एका इंजिनमध्ये बिघाड झाल्याने त्याला थेट महामार्गावरच विमान उतरावे करावे लागले. डगलस स्ट्रीट येथे महामार्ग उघडण्याआधी 2 तासांपुर्वी ही घटना घडली.

पोलिसांनी सांगितले की, पायलटला इमर्जेंसी लँडिग करावे लागले. घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. पायलट ली समिट विमानतळावर विमान लँड करत असताना इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे महामार्गावर विमान उतरवावे लागले. या घटनेमुळे काही तासांसाठी रोड बंद करण्यात आला होता.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावर भरधाव गाड्या चालत असताना विमानाला अचानक रस्त्यावर उतरताना पाहून लोक देखील हैराण झाले.

Loading RSS Feed

Leave a Comment