10वी, 12वीच्या बोर्ड परीक्षांसाठी लॉकडाऊनमध्ये सूट, अमित शाहांची घोषणा

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांबाबत मोठी घोषणा केली आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील या बोर्डाच्या परिक्षा होऊ शकतात व परीक्षेसाठी राज्य सरकारने स्पेशल बसची सोय करावी, असे शाह यांनी म्हटले आहे.

कोरोना व्हायरस महामारीमुळे अनेक राज्यांनी 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा स्थगित केल्या होत्या. लॉकडाऊनमुळे शाळा असल्याने या परीक्षांचे आयोजन करणे देखील शक्य नव्हते. मात्र आता अमित शाह यांनी लॉकडाऊनमध्ये बोर्ड परीक्षांसाठी सुट दिली आहे.

अमित शाह यांनी ट्विट केले की, मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांची शैक्षणिक आवड लक्षात घेऊन 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड परीक्षा आयोजित करण्यासाठी लॉकडाऊनमध्ये सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांसाठी सोशल डिस्टेंसिंग, फेस मास्क इत्यादी नियम पाळणे अनिवार्य असेल.

गृह मंत्रालयाने सर्व राज्यांच्या बोर्डांना सांगितले आहे की परीक्षेच्या आजोयनासाठी परीक्षा केंद्र कंटेनमेंट झोनमधील नसावेत. परीक्षेच्या वेळी विद्यार्थी, शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य असले. केंद्रांवर सोशल डिस्टेंसिंगचे पालन गरजेचे आहे. केंद्रावर सर्वांचे स्क्रिनिंग केले जाईल व सॅनिटायझरचा वापर करावा.

Leave a Comment