नोकरी भरती : एनएचएआयमध्ये डेप्युटी मॅनेजर होण्याची संधी, विना परीक्षा मिळणार नोकरी

युवकांसाठी केंद्र सरकारची नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी आहे. रस्ते परिवहन आणि महामार्ग मंत्रालयांतर्गत येणारे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणामध्ये (एनएचएआय) डेप्युटी मॅनेजर पदासाठी नोकरीची संधी आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. निवड झालेल्या उमेदवारंना 7व्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल.

एकूण 48 पदांपैकी यातील 20 सामान्य श्रेणीतील आहेत. ओबीसी (एनसीएल) सेंट्रल लिस्टसाठी 15 पदे, एससी – 06, एसटी – 04 आणि ईडब्ल्यूएससाठी 3 पदे आरक्षित आहे. दिव्यांगांसाठी देखील पदे आरक्षित आहेत.

पात्रता –

या पदासाठी मान्यता प्राप्त यूनिव्हर्सिटीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगचे पदवी असणे आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या गेट स्कोरच्या आधारावर थेट भरती होईल.

वयाची अट –

इच्छुक उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित वर्गांना नियमानुसार सुट मिळेल. 15 जून 2020 पर्यंत वयाची गणना केली जाईल.

डेप्युटी मॅनेजर पदासाठी 16 मे पासून ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून, अर्जाची अंतिम तारीख 15 जून 2020 आहे. अर्ज व अधिक माहितासाठी इच्छुक उमेदवार एनएचएआयची अधिकृत वेबसाईट nhai.gov.in ला भेट देऊ शकता.

Loading RSS Feed

Leave a Comment