कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून देशभरात लॉकडाऊन आहे. लोक घरातच असल्याने घरगुती हिंसाचारच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अनेकांना मानसिक आरोग्याची समस्या देखील होत असल्याचे म्हटले आहे. तर नवरा-बायकोंमध्ये देखील छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होत आहेत. असाच काहीसा प्रकार गुजरातच्या अहमदाबाद येथे घडला आहे.
व्हिडीओ : जेवण कमी तिखट बनविले म्हणून बाल्कनीतून उडी मारण्याचा प्रयत्न
अहमदाबाद येथील चंदखेडा येथे एका व्यक्तीने चक्क भाजी तिखट न झाल्याने बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारण्याची धमकी दिली. पोलिसांनुसार, नवऱ्याला भाजी अधिक तिखट हवी असल्याने नवरा-बायकोमध्ये भांडण झाले. यानंतर पतीने थेट बाल्कनीमधून उडी मारण्याची धमकी दिली. या संदर्भात कोणतीही तक्रार अद्याप दाखल करण्यात आलेली नाही.
Fight over lunch menu, husband tries to jump out of his balcony. #Ahmedabad 😥 pic.twitter.com/iXLVCN4foV
— Godman Chikna (@Madan_Chikna) May 18, 2020
या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत असून, व्हिडीओमध्ये दिसत आहे की, व्यक्ती बाल्कनीमध्ये लटकला आहे. त्यानंतर शेजारी येतात व त्याला वरती खेचतात.