येत्या 1 जूनपासून रोज धावणार 200 नॉन एसी ट्रेन – पियुष गोयल


नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन लागू विविध राज्यात अनेक नागरिक आणि मजूर अडकले आहे. त्याच पार्श्वभूमीवर रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी येत्या 1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन धावणार असल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.


लवकरच येत्या 1 जूनपासून सुरु होणाऱ्या या ट्रेनसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू होणार आहे. वेळापत्रकानुसार या ट्रेन चालवल्या जाणार असून लवकरच याबाबतची माहिती दिली जाईल, असे पियुष गोयल यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रत्येक राज्याने कामगारांना जवळच्या मोठ्या रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचण्यासाठी मदत करावी. तसेच कामगारांचे रजिस्ट्रेशन करुन त्याची यादी रेल्वेला द्यावी, असे आवाहन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी राज्य सरकारांना केले आहे.

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी मजुरांना आवाहन करताना म्हटले की, जिथेत आहात तिथेच तुम्ही थांबा, तुम्हाला तुमच्या गावी पोहोचवले जाईल. देशभरात रोज शेकडो विशेष श्रमिक ट्रेन धावत आहेत. आतापर्यंत 1600 ट्रेनच्या माध्यमातून 21.5 लाख मजुरांना त्यांच्या निश्चित स्थळी पोहोचवण्यात आल्याची माहिती रेल्वेने दिली.

Leave a Comment