आता फेसबुकवर थाटा तुमचे दुकान

महामारीमुळे संकटाचा सामना करावा लागत असलेल्या व्यवसाय आणि व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी फेसबुकने ऑनलाईन दुकानांची सेवा सुरू केली आहे. या नवीन फीचर अंतर्गत दुकानदार फेसबुक आणि इंस्टाग्रामवर ऑनलाईन शॉप्स उघडून आपले उत्पादन विकू शकतील. फेसबुकनुसार या नवीन फीचरचा मुख्य उद्देश हे सुनिश्चित करणे आहे की लघू व मध्यम उद्योग ऑनलाईन असावेत आणि सध्याच्या स्थितीमध्ये टिकून राहावेत.

कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग एका लाईव्ह स्ट्रिमिंगमध्ये म्हणाले की, महामारीच्या या काळात अर्थव्यवस्था पुन्हा उभी करण्यासाठी ई-कॉमर्सचा विस्तार करणे महत्त्वाचे आहे. जर दुकान अथवा हॉटेल उघडता येत नसेल तर ऑनलाईन ऑर्डर घेऊन लोकांना पाठवता येईल. व्यापारी ऑनलाईन दुकाने सुरू करू शकतात. सोबतच यासाठी जाहिरात देखील देऊ शकतील.

झुकरबर्गनुसार, हे व्यवसाय फेसबुक पेज आणि इंस्टाग्रामवर आढळतील. याशिवाय स्टोरिज आणि जाहिरातींद्वारे देखील लोकापर्यंत पोहचता येईल. फेसबुक शॉप्स टूलद्वारे एक सिंगल ऑनलाईन स्टोर बनवता येईल. जे फेसबुक आणि इंस्टाग्राम दोन्हीवर उपलब्ध असेल. या फीचरद्वारे इन- अॅपच खरेदी करता येईल व मेसेंजर, व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम डायरेक्टच्या माध्यमातून ग्राहकांशी संवाद साधता येईल.

Leave a Comment