हायड्रोक्सीक्लोरोक्वीन कोरोनावर खूपच परिणामकारक – तेलंगाना सरकार

तेलंगाना सरकारद्वारे तयार करण्यात आलेल्या एका अंतरिम रिपोर्टमध्ये राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाच्या संक्रमणापासून वाचविण्यासाठी  हायड्रोक्सीक्लोरोक्वीन खूपच परिणाम ठरले असल्याचे म्हटले आहे. या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की ज्या 70 टक्के लोकांनी हे औषध घेतले त्यांच्यात व्हायरसचे कोणतेही लक्षण आढळले नाही. या 394 आरोग्य कर्मचाऱ्यांची रोगप्रतिकारक क्षमता अधिक मजबूत दिसून आली. यातील 71 टक्के कर्मचाऱ्यांचा कोरोनाचा रिपोर्ट नेगेटिव्ह आला आहे.

या अभ्यासाचे दोन प्रमुख उद्देश होते. यामध्ये पहिला उद्देश हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा प्रभाव तपासणे आणि दुसरा उद्देश आरोग्य कर्मचाऱ्यांना संक्रमणापासून वाचविण्यासाठी पीपीईची क्षमता तपासणे हा होता. या अभ्यासासाठी 694 पैकी 533 कर्मचाऱ्यांना औषध देण्यात आले. यानंतर सलग हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचा उपयोग करून 7 आठवड्यांनी त्यांच्यावर अभ्यासात करण्यात आला.  मात्र काही कर्मचाऱ्यांनी याच्या साइट इफेक्ट्समुळे डोस घेणे बंद केले होते.

रिपोर्टनुसार, हायड्रोक्सीक्लोरोक्वीनचे सेवन करणाऱ्या 533 पैकी 394 कर्मचाऱ्यांचा कोरोनाग्रस्तांशी संपर्क आला होता. या सर्वांना कोरोनाग्रस्तांजवळ जाताना पीपीई किट घालण्याची सुचना देण्यात आली होती. यातील कोणत्याही कर्मचाऱ्यामध्ये कोरोनाचे लक्षण आढळले नाही.

Leave a Comment