चीनमध्ये हा प्राणी झाला दुर्मिळ, 2 किलो मांस लाखो रुपयांना

चीनच्या नागरिकांच्या जीव-जंतू खाण्याच्या सवयीने एक जीव विलुप्त होण्याच्या स्थितीत आहेत. या जीवाचे नाव चाइनीज जायंट सॅलामेंडर असून, याला लिव्हिंग फॉसिल म्हणजे जीवित जीवाश्म देखील म्हटले जाते. याचा वापर पारंपारिक चीनी औषधांसाठी केला जातो.  हा एक दुर्मिळ जीव असून, चीनच्या यांग्तजे नदीशिवाय उत्तर अमेरिका आणि जापानमध्ये आढळतो. मात्र सर्वात मोठा सॅलामेंडर चीनमध्ये आढळतो.

Image Credited – Aajtak

याचा इतिहास 17 कोटी वर्ष जुना असल्याने याला जीवित जीवाश्म म्हटले जाते. डायनोसॉरच्या प्रजातीपासून याची उत्पत्ती झाल्याचे म्हटले जाते. चीनमध्ये एका जायंट सॅलामेंडरचे दोन किलो मांस 1500 डॉलर म्हणजे 1.13 लाख रुपयांना मिळते. आता चीनमध्ये याचे फार्म हाउस बनत आहे. जेणेकरून याचे उत्पादन करता येईल. मात्र नैसर्गिकरित्या ही प्रजाती लुप्त होत चालली आहे. हा एकमेव असा उभयचर जीव आहे जो आयुष्यभर पाण्यात असतो.

Image Credited – Aajtak

चीनमध्ये आढळणारा जायंट सॅलामेंडर एका व्यक्ती एवढा लांब असतो. चीनमधील सॅलामेंडर 5.90 फूटचा असतो, तर अमेरिकेत आढळणारा 28 इंच असतो. 1970 च्या दशकात सॅलामेंडर चीनच्या क्विनलिंग पर्वतीय भागातील आजुबाजूच्या जलस्त्रोतांमध्ये मोठ्या प्रमाणात आढळत असे. याचा आवाज लहान बाळाच्या रडण्यासारखा असल्याने पर्वतीय भागातील लोक याला अशुभ मानतात. मात्र दक्षिण चीनमधील लोकांना याला खाण्यास सुरूवात केल्यावर याची मागणी वाढली. आता ही प्रजाती लुप्त होत चालली आहे.

Leave a Comment