भारताशी संबंधीत हा ऐतिहासिक वारसा पाण्याखाली जाणार ?, चीन-पाकिस्तानचा नवा प्रकल्प

पाक व्याप्त काश्मिरमधील गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये चीन धरण बांधण्यांच्या तयारीत आहेत. मात्र यासोबतच या भागातील स्थानिक लोकांनी धरणाच्या निर्मिती आधी येथील ऐतिहासिक वारसा वाचवण्याची मागणी केली आहे. या धरणामुळे दियामीर, हुंजा, नगर आणि बाल्टिस्तान जिल्हे पाण्याखाली जातील.

जी चार शहर पाण्याखाली जातील, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणआत ऐतिहासिक वारसा आहे. चारही शहरांमध्ये बौद्ध धर्माशी संबंधित शेकडो दगडांवर पौराणिक कलाकृती आहेत. त्यामुळे स्थानिक लोकांनी मागणी केली आहे की धरणाच्या आधी या कलाकृतींना एखाद्या ठिकाणी सुरक्षित ठेवावे. या कलाकृती 269 ते 232 ईसा पुर्वमध्ये सम्राट अशोकाच्या काळात बनवण्यात आल्या आहेत, असे मानले जाते. या कलाकृती स्तूप आणि बौद्ध मठांशी संबंधित आहेत.

पाकिस्तान सरकारने 13 मे ला चीन सरकारसोबत या धरणाच्या निर्मितीसाठी 20,797 कोटी रुपयांचा करार केला आहे. पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ अहमद हसन दानी म्हणाले की या दगडांना चार विभागांमध्ये विभागले आहे. सर्वात जुन्या श्रेणीतील दगड दुसर्‍या शतकातील असू शकतात. किंवा इ.स.पू. 5व्या अथवा 6 शतकातील असू शकतात. बौद्ध धर्म गुरू दलाई लामा यांनी देखील या कलाकृती वाचवण्याचे आवाहन केले होते.

Leave a Comment