चीनमधून कंपन्यांना परत आणण्यासाठी अमेरिकन काँग्रेसमध्ये विधेयक सादर

कोरोना व्हायरस महामारीवरून मागील काही दिवसांपासून चीन आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. याच पार्श्वभुमीवर अमेरिकन कंपन्यांच्या उत्पादन युनिट्सला चीनमधून परत आपल्या देशात आणण्यासाठी अमेरिकेच्या खासदाराने काँग्रेससमोर एक विधेयक सादर केले आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे चीनमधील अनेक अमेरिकन कंपन्या तेथून बाहेर पडण्याची शक्यता आहे.

अमेरिकन खासदार मार्क ग्रीन यांच्याद्वारे सादर करण्यात आलेले विधेयक द ब्रिंग अमेरिकन कंपनी होम अ‍ॅक्टमध्ये या कंपन्यांना परत आणण्यासाठी लागणार खर्च आणि चीन आयातवर लागणारे आयात शुल्क देण्यास सांगितले आहे. ग्रीन म्हणाले की, आपली अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अमेरिकेत गुंतवणुकीला आकर्षित करणे गरजेचे आहे. मात्र कंपन्यांना पुन्हा अमेरिकेत येण्यासाठी सर्वात मोठी समस्या खर्च आहे. अनेक कंपन्यांसाठी हे पाऊल खर्चिक आणि जोखिमपुर्ण आहे.

ते म्हणाले की, चीनने सिद्ध केले आहे की ते विश्वासार्ह्य भागीदार नाहीत. अमेरिकेला पुन्हा विकसित करणे आणि चीनवरील निर्भरता कमी करण्यासाठी संधी निर्माण करायला हवी आणि आपल्याच देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन द्यायला हवे. माझे विधेयक विकासासाठी असून, असे करणेच उचित आहे.

Leave a Comment