टोयोटाने आणली नवी शानदार ‘वेंझा’ एसयूव्ही

टोयोटाने आपली नवीन एसयूव्ही वेंझा (Venza) वरील पडदा उठवला आहे. ही एसयूव्ही काही महिन्यांपुर्वी जापानमध्ये लाँच झालेल्या टोयोटा हॅरियरचे लेफ्ट-हँड ड्राईव्ह व्हर्जन आहे. याचे डिझाईन आणि इंटेरियर देखील हॅरियरशी मिळते-जुळते आहे. 2021 टोयोटो वेंझामध्ये हायब्रिड पॉवरट्रेन देण्यात आले आहे.

टोयोटा वेंझामध्ये 2.5 लीटर, 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. या हायब्रिड पेट्रोल इंजिनचे कम्पाइंड पॉवर आउटपूट 219बीएचपी आहे. इंजिन सीव्हीटी गियरबॉक्ससोबत येते. यात नॉर्मल, इको आणि स्पोर्ट्स असे तीन ड्रायव्हिंग मोड्स मिळतील. या नवीन एसयूव्हीमध्ये 12.3-इंच टचस्क्रीन डिस्प्ले, 9 JBL स्पीकर्स, 7-इंच MID, डिजिटल रियर व्ह्यू मिरर्स आणि 10-इंच कलर हेड-अप डिस्प्लेचा समावेश आहे. याशिवाय यात पॅनोरमिक ग्लास रूफ आणि हीटेड व वेंटिलेटेड फ्रंट सीट्स देण्यात आले आहे.

Image Credited – navbharattimes

सेफ्टी फीचर्सबद्दल सांगायचे तर यात डेटाइम/लो-लाइट व्हिइकल आणि पेडेस्ट्रियन डिटेक्शनसोबत प्री-कलिजन सिस्टम, प्लस डेटाइम बायसाइकल डिटेक्शन, फुल-स्पीड रेंज डायनॅमिक रडार क्रूज कंट्रोल, स्टेअरिंग असिस्टसोबत लेन डिपार्चर अलर्ट, ऑटोमॅटिक हाय बीम्स, लेन ट्रेसिंग असिस्ट आणि रोड साइन असिस्ट या फीचर्सचा समावेश आहे.

Image Credited – navbharattimes

टोयोटा वेंझा या वर्षीच्या अखेरपर्यंत अथवा पुढील वर्षीच्या सुरूवातीला अमेरिकन बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. या एसयूव्हीची किंमत 35 हजार डॉलर (जवळपास 26.50 लाख रुपये) असू शकते. भारतीय बाजारात ही एसयूव्ही कधी लाँच होईल याची माहिती अद्याप देण्यात आलली नाही. भारतीय बाजारात टोयोटा मारुती ब्रेझावर आधारित नवीन एसयूव्ही अर्बन क्रुजर आणण्याच्या तयारीत असून, ऑगस्टमध्ये ही कार लाँच होऊ शकते.

Leave a Comment