फुटबॉल स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या जागी सेक्स डॉल्स, मागावी लागली माफी

फोटो साभार अमर उजाला

द. कोरिया मध्ये रविवारी पार पडलेल्या महत्वाच्या के लीग चँपियनशिप फुटबॉल स्पर्धेत एफसी सियोलने ग्वान्ग्जू विरुध्द खेळलेला एक स्थानिक सामना जिंकला असला तरी त्यामुळे वेगळ्याच कारणाने के लीग फुटबॉल क्लबला माफी मागण्याची पाळी आली आहे.

कोविड १९ च्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यासाठी जगभरातील अनेक देशातून लॉक डाऊन सुरु असून त्याचा विपरीत परिणाम क्रीडा क्षेत्रावर झाला आहे. परिणामी अनेक महत्वाच्या स्पर्धा रद्द कराव्या लागल्या आहेत किंवा पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. ज्या देशात लॉक डाऊन उठविला गेला आहे तेथे अनेक स्पर्धा प्रेक्षकांशिवाय घेतल्या जाऊ लागल्या आहेत. त्यामुळे कोरियातील ही स्पर्धाही प्रेक्षकांशिवाय घेतली गेली होती.

पण या स्पर्धेच्या वेळी प्रेक्षक असल्याचा फील यावा आणि तसा माहोल निर्माण व्हावा म्हणून प्रेक्षकांच्या जागेत काही पुतळे बसविले गेले होते. नंतर हे पुतळे नसून सेक्स डॉल्स असल्याचे समजल्यावर सोशल मीडियावर टीकेचा भडीमार झाला आणि त्यामुळे के फुटबॉल क्लबला झाल्या प्रकाराबद्दल माफी मागावी लागलीच पण यापुढे या बाबत गंभीरपणे विचार करू आणि पुन्हा असे घडणार नाही असा कबुली नामा द्यावा लागल्याचे समजते.

Leave a Comment